राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेचे सातेफळ शाळेतील विद्यार्थिनी घेत आहेत प्रशिक्षण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
    जामखेड तालुक्यातील सातेफळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींना, राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे. मुलींनी त्यामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदविला आहे. 
    महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण, क्रीडा विभाग, समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई  व Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात सर्वत्र शाळांमध्ये मुलींसाठी ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा’ कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
    या उपक्रमाअंतर्गत गटविकास अधिकारी श्री.प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी श्री.कैलास खैरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुरेश कुंभार आदींच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील 34 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे.
    जामखेड तालुक्यातील खर्डा केंद्रातील सातेफळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्र प्रमुख राम निकम सर मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहलता उगले मॅडम, कविता माने मॅडम, स्मिता डोंगरे मॅडम, ज्ञानेश्वर दाते सर, राजाभाऊ राठोड सर, व्यंकटेश कुलकर्णी सर, आदींच्या मार्गदर्शनाखाली राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण योजनेचे जामखेड तालुका प्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे सचिव संतोष बारगजे व तनिष्का डाडर या शाळेतील मुलींना तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण देत आहेत. 
वेळप्रसंगी स्वसंरक्षणासाठी मुलींना प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल
     राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत आमच्या शाळेमध्ये सुरू असलेल्या तायक्वांदो प्रशिक्षणामुळे 
मुलींना नवीन काहीतरी शिकायला मिळत असून, यामुळे त्यांच्यामध्ये हा खेळ शिकण्यासाठी उत्सुकता व सहभागी होण्याची धडपड दिसून येत आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेले प्रशिक्षक मुलींना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी परिश्रम घेत आहेत. या प्रशिक्षणामुळे मुलींना व्यायामाची सवय लागली आहे. तायक्वांदो सारखे प्रशिक्षण घेतल्यामुळे गरज पडल्यास त्या स्वतःचे रक्षण स्वतःच करतील. ग्रामीण भागातील मुलींना अशा प्रशिक्षणाची गरज आहे. 
श्रीमती स्नेहलता उगले मॅडम,
मुख्याध्यापिका जि. प. प्राथमिक शाळा सातेफळ

ad

Post a Comment

Previous Post Next Post