25 ते 27 दरम्यान राष्ट्रीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा
राष्ट्रीय सब ज्युनियर क्योरुगी आणि पुमसे तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला असून, बुधवारी रात्री मुंबईतून रवाना होणार आहे.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने कटकच्या (ओडिशा) जे. एन. इनडोअर स्टेडियममध्ये 25 ते 27 मार्च दरम्यान राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई (ताम) या राज्य संघटनेच्या आधिपत्याखाली रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो असोशिएशन च्या वतीने 17 ते 19 मार्च 2023 दरम्यान महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा डेरवण (रत्नागिरी) येथे पार पडली. ताम चे खजिनदार व्यंकटेश कररा यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेतील विजेत्यांची राज्य संघात निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा संघ मुले : वियान दिघे (पुणे), यश भारत पस्ते (मुंबई उपनगर), आर्यन शांताराम वानखेडे (जळगाव), सार्थक राजू निमसे (नगर), सोहम सुदेश खामकर (रत्नागिरी), मोहंमद झैद वसीम हमदुले (रत्नागिरी), तनिष्क सुनील सागवेकर (मुंबई), कृष्णा जाधव (पुणे), श्रीधर मोहिते (पुणे), अर्णव बावडकर (पुणे), वेद वि. मोरे (रायगड), रोनित प्रणाम जाधव (ठाणे), सौम्या एस. दास (मुंबई उपनगर), विघ्नेश गायकवाड (पुणे).
मुली : सुरभी राजेंद्र पाटील (रत्नागिरी), अनन्या अच्युतराव रणसिंग (नगर), वैष्णवी नीलेश बेरड (नगर), प्रियांका प्रकाश मिसाळ (नगर), श्रावणी अच्युतराव रणसिंग (नगर), संचिता एस. घाणेकर (मुंबई), साजिया मोहम्मद हुसेन शेख (नगर), सार्थ संजय ठाकूर (मुंबई), स्वरा संतोष नितोरे (पालघर), आर्या मनीष काळे (अमरावती), तमसीन वाजिद शेख (सोलापूर), शेजल श्रीमल (पुणे), उज्ज्वला मरगळे (पुणे), पुमसे संघ : अर्णव दिलीप जगताप (ठाणे), तनिष्का वेल्हाळ (मुंबई), ग्रेसन अंकुर गावित (ठाणे), राधिका ऋषिकेश भोसले (ठाणे), शौर्य धनंजय जाधव (ठाणे), अर्णव दिलीप जगताप (ठाणे), आर्या चव्हाण (मुंबई), प्रतिती देसाई (मुंबई).
मुलांच्या संघाचे प्रशिक्षक प्रशांत टी. कांबळे, तर संघ व्यावस्थापक म्हणून जळगावचे अजित घारगे यांची निवड करण्यात आली. तर, मुलींचे प्रशिक्षक म्हणून नगरचे दिनेशसिंग राजपूरत यांची निवड करण्यात आली. पुमसे संघाचे प्रशिक्षक म्हणून रॉबिन वॉल्टर मेनेझेस यांनी निवड करण्यात आली.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई या राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम प्रवीण बोरसे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार वेंकटेश कररा, नीरज बोरसे, सतीश खेमसकर आदींनी संघाला शुभेच्छा दिल्या.