जामखेड आणि अहमदनगर येथील रहिवासी चंदुकाका ज्वेलर्स चे मालक रसिकलाल कोठारी वय ७० वर्ष यांचे दि १८/६/२०२३ रोजी मुंबई येथील लीलावती हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन झाले आहे त्यांच्या मागे वडील चंदुलाल भाऊ तीन कांतीलाल, अमृत, अनिल कोठारी एक बहीण बेबी सुभाष सोनी मंडलेचा एक मुलगा अमित कोठारी आणि एक मुलगी रश्मी सम्यक सुराणा मनमाड सुना नातवंडे असा परिवार आहे त्याचेंवर दि १९ ६/२०२३ रोजी अहमदनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
कोठारी यांचे अहमदनगर, श्रीरामपूर, कडा येथे चंदुकाका ज्वेलर्स नावाने दुकान आहे जिल्हात बांधकाम क्षेत्रात मोठे ठसा योगदान आहे ते सतत गोरगरिबांना सतत मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व होते
अहमदनगर व जामखेड कोठारी परिवार मोठा आहे राजकीय, सामाजिक ,व्यापारी अशा क्षेत्रात ,ॲड. अशोक, डॉ. रमेश ,विजय ,कांतीलाल, सुमतीलाल, अमृत,अनिल, सुनील, राजेंद्र ,संजय, पारस कोठारी यांचे नाव आहे