आरोळे हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया व तपासणी शिबिर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क:
जामखेड तालुक्यासाठी वरदान असलेल्या ग्रामीण आरोग्य प्रकल्प (CRHP) अर्थात आरोळे दवाखाना यांच्या वतीने येत्या 11 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील जनतेसाठी विशेषतः कोरोना काळात देवदूत ठरलेले डॉ. रवी आरोळे व डॉ. शोभा आरोळे यांचा मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार आहे. या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड (CRHP) येथे ११ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत या भव्य मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या या शिबिरामध्ये खालील आजारांवर तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. हर्नीया, मुतखडा, (किडनी स्टोन) हायड्रॉक्सिल, अपेंडिक्स, प्रोस्टेट शस्त्रक्रिया, छातीच्या गाठी, व्हेरिकोज व्हेन्स, (पायावरच्या काळ्यानिळ्या शिरा ) हाताच्या सर्व प्रकारच्या विकृती, जळालेले विकृती, स्त्री व पुरुषांच्या सर्व प्रकारच्या गाठी, चिकटलेले बोटे व वाकडी असलेली बोटे
वरील आजारांवर तपासणी करुन उपचार / शस्त्रक्रिया करण्यासाठी कॅनडा, स्विझरलँड, ऑस्ट्रेलीया अशा परदेशातील तज्ञ डॉक्टरांकडू अगदी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल त्यामुळे इच्छुकांनी आपल्या नावाची ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड (CRHP) ता. जामखेड जि.अ नगर (आरोळे दवाखाना) येथे नोंदणी करावी.
अधिक माहिती व संपर्कासाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा.
कार्यालय ( ०२४२१) - २२१३२२
जयेश कांबळे मो. ७७२००६२५५५,
आसिफ पठाण मो. ८८३०६६१०१०,
मधु वाळुंजकर मो. ९७६४७६१४०२,
सुरेखा सोनवणे मो. ९४२३२०८१७५
Tags
आरोग्य