शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे मोलाचे योगदान - प्रा. सचिन गायवळ

जामखेड प्रतिनिधी :- जामखेड तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षक मेहनतीने काम करत असून त्यांना मोलाची साथ व पेरणा गट विकास अधिकारी प्रकाश पोळ व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे दोघे देत आहेत. त्यामुळे जामखेड तालुका नक्कीच गुणवत्तेत प्रथम क्रमांकावर येईल असा विश्वास बास्केटबॉल संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष व जामखेड चे भूषण प्रा. सचिन गायवळ यांनी व्यक्त केला.

जामखेड येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयास प्रा. सचिन गायवळ यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी कार्यालयाच्या वतीने त्यांचा झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी 
त्यांनी आपले विचार मांडले. तसेंच भविष्यात हवे ते सहकार्य करण्याबाबत ग्वाही दिली.

    यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, आदी मान्यवर उपस्थित होते.
     
       त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनीही जामखेड तालुक्यातील शिक्षण विभागाचे काम चांगले असून वेगाने प्रगती होत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. गोर गरिब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत असल्याचे सांगितले यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post