नागेश व कन्या विद्यालयात संविधान दिन व एनसीसी दिन मोठ्या उत्साहात संपन्न

 
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :- 
 रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश व  कन्या विद्यालय मध्ये रविवारी 26 नोव्हेंबर संविधान दिन व एन. सी. सी. दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

      सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे नागेश विद्यालयाच्या युनिट व नागेश कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संविधान दिन रॅली व एनसीसी दिन रॅली काढली व जामखेड शहरात जनजागृती केली . तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील एनसीसी कॅडेट यांनी स्वच्छता करून मान्यवरांच्या हस्ते स्मारकाचे पूजन करण्यात आले.


      कार्यक्रमाची सुरुवात संविधान पूजन करून झाली. एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांनी संविधानाचे वाचन केले. प्रास्ताविक प्राचार्य मडके बी के यांनी केले.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष कन्या विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात  ,नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर ,कन्या विद्यालय स्कूल कमिटी  सुरेश भोसले ,प्रकाश सदाफुले. दशरथ निमोणकर, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका चौधरी के डी पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, पर्यवेक्षक संजय हजारे, प्रा विनोद सासवडकर , एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने ,साळुंखे बी एस रघुनाथ मोहोळकर ,संतोष सरसमकर, सुग्रीव ठाकरे नागेश कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी एनसीसी कॅडेट उपस्थित होते.

     26 नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .तसेच नोव्हेंबर महिन्यातील चौथा रविवार एनसीसी दिन म्हणून साजरा केला जातो. 
 
    एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांनी राष्ट्रीय छात्र सेनेची माहिती दिली व सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर चेतन गुरुबक्ष व ऍडम ऑफिसर रणदीप सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्कृष्ट काम करत आहोत विद्यालयातील एनसीसी युनिट विविध उपक्रमाचे उत्कृष्ट पद्धतीने भाग घेत आहेत. असे मनोगत व्यक्त केले.
           कन्या विद्यालय स्कूल कमिटी सदस्य सुरेश भोसले यांनी मनोगत मध्ये संविधान दिनाच्या व एनसीसी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर प्रा विनोद सासवडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
        
     कार्यक्रमचे अध्यक्ष प्रा मधुकर  राळेभात  मनोगत मध्ये संविधान म्हणजे देशाचा आत्मा आहे. 
  भारतीय संविधान हे स्वतःप्रत अर्पण करायचे  संविधानाचा सन्मान करायचा आहे. संविधानामुळे आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुत्व स्थापन होते. 
एनसीसी मुळे शिस्त अंगीकृत होते भूदल, वायुदल, नौदल, या मध्ये भरती होण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेचा माध्यमातून जाता येते. 
    एनसीसी मुळे संरक्षण क्षेत्रामध्ये नोकरीची संधी प्राप्त होते.  असे मनोगत व्यक्त करून संविधान दिन व एनसीसी दिन निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचल संभाजी इंगळे तर आभार प्रदर्शन संजय हजारे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post