हजारोंचे प्राण वाचवणाऱ्या कोठारी कुंटुबास देवाने न्याय का नाही दिला - खा सदाशिव लोखंडे

जामखेडचे माजी सरपंच सुनील कोठारी यांचे चिरंजीव आणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे पुतणे स्व. संदेश कोठारी यांचे नुकतेच दु:खदअपघाती निधन झाले असल्याने. शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी जामखेड येथील सुनील कोठारी यांच्या निवास स्थानी जाऊन त्यांची व सर्व कुंटुबियांची भेट घेऊन सांत्वन केले. 
तसेच
 कोठारी परिवारांचे सामाजिक कार्यात असलेले योगदान पाहून आणि हजारोंचे प्राण वाचवणारे कोठारी परिवार यांच्यावर ही वेळ येणे फार दुःखद असुन भगवंता पुढे काही विलाज नाही असे स्पष्ट करत संदेश च्या मृत्यु बदल दु:ख व्यक्त करत लोखंडे कुटुब आपल्या दुखात सहभागी असुन पुढेही आपल्या कुटुबा प्रति स्नेह भाव व आदरच ठेवील अशी ग्वाही देत हळहळ व्यक्त केली कोठारी यांनी अपघातातील हजारो लोकांचे प्राण वाचवले असताना अशी घटना व्हायलाच नको होती कारण कोठारी कुटुब
बऱ्याच वर्षापासून समाजसेवा करत आहे तसेच मी संपूर्ण जिल्हा व तालुक्यात फिरत असताना जिथे तिथे संदेशची चर्चा होती. कमी वयात खूप काही संदेशने केले आहे. याबद्दल मला दुःख वाटते. आपण या दु:खातून सावरा तुमच्या दुःखात आम्ही लोखंडे कुटुंबिय सामील आहोत अशी भावना 
खासदार सदाशिव लोखंडे व्यक्त केली. यावेळी सुनील कोठारी ,सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी , संकेत कोठारी, अंकुश उगले, अजय कोठारी ,सतीश शिंदे, विजय पवार ,राहुल उगले, हूले कॉन्ट्रॅक्टरआदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post