बीड - क्रीडा व युवक सेवा
संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, लातूर जिल्हा व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने लातुरात शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. बीडच्या नयन बारगजे व श्रवण तांबारे यांनी २ सुवर्णपदके जिंकली आहेत. मध्यप्रदेश येथील राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी दोघांची निवड झाली आहे.
जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद पठारे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य संघटनेचे अध्यक्ष तथा शासनच्या तांत्रिक समिती सदस्य डॉ. अविनाश बारगजे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, व्यंकटेश कररा, राजेश महाजन, तांत्रिक समिती सदस्य प्रमोद दौंडे यांची उपस्थिती लाभली. या २१ ते २३ डिसेंबर २०२३ पार पडलेल्या राज्य शालेय तायक्वांदो स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडाधिकारी सुरेंद्र कराड, सारिका काळे, क्रीडाधिकारी जयराज मुंडे, जिल्हा संघटनेचे सचिव नेताजी जाधव परिश्रम घेतले . राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या कुमारी नयन बारगजे ( गजानन विद्यालय राजुरी ) व श्रवण तांबारे (राज्यस्थानी विद्यालय बीड ) यांनी २ सुवर्णपदके पटकावली.
.यशस्वी चव्हाण ( गुरुकुल इंग्लिश स्कूल ) व अभिषेक आमटे ( राजस्थानी विद्यालय ) यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारून २ रौप्यपदके जिंकली. सार्थक भाकरे ( संस्कार विद्यालय ), यश चव्हाण (गुरुकुल इंग्लिश स्कूल ), सार्थक विधाते (सेंटअंन्स इंग्लिश स्कूल ), ओंकार परदेशी (राजस्थानी विद्यालय ), सृष्टी योगे ( गुरुकुल इंग्लिश स्कूल ) व सृष्टी कौशल्य (राजस्थानी विद्यालय ) यांना ६ कांस्यपदके जिंकली . रमण डागले, ओमराजे वडमारे, ओंकार जावळे , यश खाडे , सिद्धांत नवले, अर्जुन गवते , दर्शनी शिंदे, तेजोनिधी डाके, कार्तिकी मिसाळ, प्रतीक्षा आमटे , सलोनी जौंजाळ यांनी सहभाग नोंदवला. हे सर्व खेळाडू डॉक्टर अविनाश बारगजे, जया बारगजे यांच्या जिल्हा स्टेडियम येथील तायक्वांदो प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू आहेत. स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून ऋत्विक तांदळें, प्रणव सिरसाट, सुरज देशमुख, देवेंद्र जोशी व सुदर्शन गायकवाड यांनी काम पाहिले.
पुणे विभागाचे वर्चस्व....
"मुलींच्या गटात पुणे विभागाचे वर्चस्व दिसून आले. या स्पर्धेत अनेक प्रतिभावान खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. सर्व गटातील विजेते मुले व मुलीं काटोल, मध्यप्रदेश मध्ये ३१ डिसेंबर २०२३ ते ५ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
या सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे डॉ. योगेशभैय्या क्षीरसागर, डॉ. सारिकाताई क्षीरसागर , जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा, दिनकर चौरे, बन्सी राऊत, भारत पांचाळ, डॉ. विनोद पवार, सुनील राऊत, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, तालुका क्रीडा अधिकारी चव्हाण , योगेश करंडे, जीतू आर्क, पोलीस उप निरीक्षक युवराज पोठरे, अविनाश पांचाळ, सचिन जायभाये ,मनेष बनकर, साहू प्रसाद, अनिस शेख, नितीन आंधळे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेंत.
नयनचे १० वे सुवर्णपदक !!
सन २०१६ ते २०२३ दरम्यान नयन बारगजे हिने महाराष्ट्र राज्य पातळीवर १० वे सुवर्णपदक जिंकले. ओपन, गोंदिया २०१६ , सब जुनिअर -नवी मुंबई २०१६, सब जुनिअर -कोल्हापूर २०१७, शालेय -औरंगाबाद २०१८, शालेय -गोंदिया २०१९ ,जुनिअर- जळगाव २०२२, जुनिअर- रत्नागिरी २०२२, शालेय -जळगाव २०२२, ओपन -मुंबई २०२३, शालेय - लातूर २०२३ या राज्यस्तरीय स्पर्धा मध्ये १० सुवर्णपदक जिंकली आहेत. तेलंगणा, राजस्थान, मणिपूर, कर्नाटक व पुणे , महाराष्ट्र येथील राष्ट्रीय स्पर्धेतही तिने ४ सुवर्ण व १ रौप्यपदक जिंकली आहेत.