महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,अहमदनगर अधिनस्त अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा आरोळेनगर, ता-जामखेड जि.अहमदनगर या निवासी शाळेत आज दि.10 जानेवारी 2024 रोजी शालेय क्रीडा स्पर्धा सन 2023-24 चे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कांबळे मॅडम व प्रमुख पाहुणे मा.श्री.बाळासाहेब धनवे साहेब, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जामखेड, मा.राघवेंद्र धनलगडे सर ल.ना.होसिंग विद्यालय जामखेड, श्रीमती लक्ष्मी ताई पवार,जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा, श्री.संतोष कुमार राऊत (संचालक प्राथमिक शिक्षक बॅंक) तसेच या कार्यक्रमास उपस्थित श्रीमती निशा पवार, कंटक मॅडम, केशर काळे, श्री.पिंपळे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून शालेय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा.श्री.बाळासाहेब धनवे साहेब यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांचे शालेय जीवनातील महत्व व करीअर संबंधी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कांबळे मॅडम यांनी संबोधित करताना उपस्थित सर्व मान्यवरांना शाळा प्रशासन व विद्यार्थ्यांच्या एकूण प्रगती बाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भुजबळ मॅडम व आभार प्रदर्शन श्री.झिरपे सर यांनी केले. या कार्यक्रमास वरिष्ठ लिपिक महानुर सर सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बाह्यस्त्रोत कर्मचारी उपस्थित होते.
Tags
क्रीडा