पूजा वंजारी-माळवे एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात मुलींमध्ये सर्वप्रथम..!
खटाव तालुक्यातील वंजारवाडी (पुसेसावळी) या गावच्या असुन त्यांचे सासरचे नाव सौ.पुजा सुहास माळवे आहे. सध्या त्या सहाय्यक निबंधक कार्यालयात पिंपरी चिंचवड पुणे येथे कार्यरत आहेत.महाराष्ट्र राज्यात मुलींच्या मध्ये प्रथम आलेल्या आहेत.
राज्यात प्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२२ च्या परीक्षेत येथील पूजा अरुण वंजारी ( मूळ गाव बोरगाव , ता . वाळवा ) ही राज्यात मुलींमध्ये प्रथम आली . तिची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे . तिच्या या यशाने सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे
गुरुवारी राज्यसेवा परीक्षेचा मुख्य निकाल जाहीर झाला . ६१३ पदांसाठी ही परीक्षा झाली होती . गुरुवारी मुलाखती होऊन अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली . या परीक्षेत मुलांत विनायक पाटील याने , त मुलींत पूजा वंजारी हिने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला . तिचे वडील शेती करतात . पूजा असोसिएटस् बाबासाहेब वंजारी व कुमार वंजारी यांची ती पुतणी आहे . पूजाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बोरगाव येथेच झाले इस्लामपूर येथील आरआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने बीई इलेक्ट्रॉनिकची पदवी घेतली आहे .