जामखेड शहरात संविधान महोत्सव उत्साहात साजरा


जामखेड प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे जामखेड शहरात याही वर्षी प्रजासत्ताक दिनी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
अकरा वर्षाची परंपरा जोपसत समस्त भिमसैनिक जामखेड जामखेड तालुका या संघटनेच्या माध्यमातून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर बाजार तळ येथे संविधान महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका कडूबाई खरात यांचा भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला. सकाळी 11 वाजता भिमसैनिकांच्या वतीने जामखेड शहरातून निळे ध्वज व तिरंगी ध्वज घेऊन मोटरसायकल रॅली काढून जय भिम जय संविधान च्या घोषणाने जामखेड वासियांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी खर्डा चौक येथे भारतीय संविधान प्रतिकृतीचे आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांच्या हस्ते पूजन व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले,माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर, मनोज कुलकर्णी, अजय काशीद उपस्थित होते.

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा समाजाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सामाजिक क्षेत्रातून रमेश गुगळे, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. रोहन टोमके, पत्रकारिता क्षेत्रातून मोहीद्दीनभाई तांबोळी. शैक्षणिक क्षेत्रातून एकनाथ चव्हाण, महिला सामाजिक क्षेत्रातून अरुणा सदाफुले व द्वारका पवार यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम स्थळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, मुख्यअधिकारी अजय साळवे ,वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक अँड अरुण जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, नगरसेवक अमित चिंतामणी, बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड, अशोक आव्हाड पंडित मोरे, प्रकाश सदाफुले, प्रभाकर घायतडक, नामदेव गंगावणे, कदम गुरुजी, प्रभाकर सदाफुले, मुरलीधर सदाफुले, सुनील जावळे,मुकुंद घायतडक, राहुल आहेर, सुरेखा सदाफुले, मालन घायतडक ,वस्तीगृहाच्या अधीक्षक शोभा कांबळे, ज्योती जावळे, कुसुम साळवे, रोहिणी सदाफुले इत्यादी उपस्थित होते.
 कार्यक्रम यशस्वी साठी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, व नगराध्यक्ष निखिल घायतडक, भिमटोला संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, दादासाहेब घायतडक,राजन समिंदर सर, रंजननाना मेघडंबर,डॉ.सचिन घायतडक, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे,सचिन सदाफुले ,संतोष थोरात, रवी सोनवणे, प्रमोद सदाफुले, मिलिंद भोसले, अक्षय घायतडक, मनीष घायतडक, विकीभाई गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post