कोल्हापूर येथे गोकुळ गायकवाड यांचा साहित्यिक म्हणून गौरव

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने    
आज मंगळवार दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी रोटरी समाजसेवा केंद्र (वातानुकुलित सभागृह) महावीर उद्याना शेजारी, कलेक्टर ऑफिसजळ नागाला पार्क कोल्हापूर येथे. न्यूज पेपर गंगाधर साहित्य परिषद कोल्हापूर आयोजित मराठी साहित्य संमेलन व राष्ट्रीय संवाद परिषद २०२४ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रत्नापूर ता जामखेड जि अहमदनगर येथे कार्यरत असणारे आदर्श शिक्षक बौध्दाचार्य साहित्यिक श्री गोकुळ श्रीरंग गायकवाड यांना संमेलनाध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांचे शुभहस्ते "राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२४ " देऊन गौरविण्यात आले. 

स्वागताध्यक्ष प्रा डॉ स्मिता गिरी . न्यूज पेपर गंगाधर साहित्य परिषद कोल्हापूर चे निमंत्रक आणि मुख्य संपादक व अध्यक्ष मा. कमलाकर वर्टेकर. न्यूज पेपर गंगाधरचे व्यवस्थापक दिपक लोखंडे, सह महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक उपस्थित होते. *सदर पुरस्कार गोकुळ* *गायकवाड यांचे सुपुत्र आविष्कार* *गायकवाड* यांनी आज कोल्हापूर येथे स्विकारला आहे.
गोकुळ गायकवाड यांचेवर सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून व नातेवाईक मित्रमंडळी कडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे....,.

Post a Comment

Previous Post Next Post