गोकुळ गायकवाड यांना वाड्ःमय पुरस्कार प्रदान


रविवार दि.११/०२/२०२४ रोजी मातंग साहित्य परिषद पुणे यांचे मार्फत आयोजित दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलना  जि.प.प्राथ. शाळा रत्नापूर ता जामखेड येथे कार्यरत असणारे आदर्श पदवीधर शिक्षक, बौद्धाचार्य, साहित्यिक श्री गोकुळ श्रीरंग गायकवाड यांच्या "माझा गाव माझी माणसं " या चरित्र ग्रंथास  लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे वाड्ःमय पुरस्कार २०२४ पद्मश्री गिरीश प्रभुणे संमेलन अध्यक्ष, पद्मश्री दादा इदाते अनु.जाती जमाती आयोगाचे सदस्य, प्रा.डॉ धनंजय भिसे अध्यक्ष मातंग साहित्य परिषद पुणे यांचे शुभहस्ते  प्रदान करण्यात आला.या यशाबद्दल  श्री गोकुळ गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे  जामखेडचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा. बाळासाहेब धनवे साहेब, विस्तार अधिकारी शिक्षण,मा सुनील जाधव साहेब,  केंद्रप्रमुख ,राजेंद्र त्रिंबके साहेब, केशव गायकवाड साहेब, सुरेश मोहिते साहेब, नवनाथ बडे साहेब,  राम निकम साहेब, शिक्षक बॅंक संचालक संतोष राऊत सर , विश्वस्त मुकुंदराज सातपुते सर  एकनाथ दादा चव्हाण, पांडुरंग मोहळकर, निशा कदम अर्जुन पवार सर, गौतम सोले सर, बाळासाहेब औटे सर, आदी मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील साहित्य कार्यास शुभेच्छा दिल्या..

Post a Comment

Previous Post Next Post