जिओ जिंदगी अभियानाने घेतले वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर


जामखेड प्रतिनिधी 
श्री क्षेत्र नारायण गड संस्थान नारळी सप्ताह शिरसमार्ग येथे जिओ जिंदगी अभियानाची आरोग्यसेवा समाजाच्या हिताची शिवाजी महाराज
गेवराई तालुक्यातील शिरस मार्ग येथे श्री क्षेत्र नारायणगड संस्थेच्या अखंड हरिनाम नारळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी आज दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी आरोग्य तपासणी शिबिराचा सर्व वारकरी  बांधवांनी लाभ घेतला यावेळी ह भ प शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत या शिबिराची सुरुवात करण्यात आली डॉक्टर पंकज घोडके यांनी आरोग्य सेवा जिंदगी अभियानच्या वतीने दिली जिओ जिंदगी टीम शिरसमार्ग अभियानाने नियोजन केले होते तसेच या शिबिरात रक्तदाब तपासणी आणि औषध गोळ्या मोफत वाटण्यात आल्या सर्व भाविकांनी त्याचा लाभ घेतला
या शिबिरासाठी समाजसेवेत सतत अग्रेसर असलेले युवा उद्योजक आशिष ओस्तवाल, रोहित लंबे ,अशोक घुगे ,सुभाष कोळेकर ,दत्ता कोळेकर ,आप्पा निर्मळ, दीपक ठोंबरे ,बंटी पांगरे आदींनी परिश्रम घेतले

Post a Comment

Previous Post Next Post