करीम हुसेनबादशहा मोमीन या विद्यार्थ्याने केले रमजान महिन्याचे रोजे पूर्ण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
श्रीगोंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा उर्दू येथे इ.५वी मध्ये शिकत असलेल्या करीम(अरसलान) हुसेनबादशहा मोमीन या विद्यार्थ्याने रमजान महिन्याचे पूर्ण रोजे (उपवास) केले. अल्लाहा ला राजी खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेतील शिक्षक समीनाबानो साचे बाजी यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना रोजी (उपवास) पूर्ण करण्याचे सूचना केल्या होत्या.
करीम(अरसलान) हुसेन बादशाह मोमीन यांनी सध्या भारत देशात निवडणूक उत्सव सुरू आहे. 

यानिमित्ताने एका व्हिडिओच्या माध्यमातून करीमने भारत व महाराष्ट्रातील तमाम जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या व महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडावे व ही निवडणूक सण उत्सव साजरा करावे व मतदान करावे. तसेच या भारत व महाराष्ट्रातील तमाम हिंदू,मुसलमान शीख, इसाई, बंधू आणि भगिनींना या व्हिडिओ च्या माध्यमातून रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post