प.पू.प्रतिभाकवरजी म.सा.यांना महाराष्ट्र प्रवर्तिनी पदवी प्रधान

जामखेड प्रतिनिधी
श्री वर्धमान स्थानक जैन श्रमण संघाकडून महाराष्ट्र राज्याचे प्रचारक महाश्रमण श्री कुंदनऋषिजी म.सा यांच्या कृपेने महाराष्ट्र राज्यात पदभ्रमण करणाऱ्या साध्वी समुदायाची व्यवस्था व श्रमणसंघाच्या प्रगतीत सहभागी होण्यासाठी खद्दरधारी कर्नाटक गजकेसरी पूज्य श्री गणेशीलालजी म.सा यांच्या परंपरे नुसार,नवकार आराधिका महासाध्वी डॉ श्री.प्रतिभाकंवरजी म.सां यांना "महाराष्ट्र प्रवर्तिनी" 
या पदाने गौरवीत आहे.

महासाध्वीजी श्रमण संघाच्या संविधानानुसार श्रमण संघाच्या सर्व नियमांचे पालन करावे.
श्रमण संघाचे आचार्य,युवाचार्य,प्रचारक तसेच सर्व पदाधिकार्यांचा सन्मान करावा.
श्रमण संघाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र राज्यात पदभ्रमण करणाऱ्या साध्वींच्या सारणा,वारणा,धारणा,सेवा,सुश्रुषा,ज्ञान,ध्यान या बाबी ध्यानात घेवून श्रमण संघाचे महत्व-प्रतिष्ठा वाढवावी.श्रमण संघात निष्ठा,संघटन आणि साधना यांना महत्व देऊन शिस्तीचे पालन करावे.चतुर्विध श्री संघ महासाध्वीजी यांच्या या कार्यात आपली संपूर्ण मदत द्यावी.

परमपूज्य प्रतिभाकवरजी म.सा. यांना ही पदवी जाहीर झाल्या मुळे धर्मोदय युवा मंच, महावीर जयंती उत्सव समिती जामखेड, जय आदिनाथ युवा मंच, भारतीय जैन संघटना, 

जामखेड येथील जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी, उद्योजक कांतीलाल कोठारी, अशोक चोरडिया, सुभाष भळगट ,सुभाष भंडारी, उद्योजक प्रवीण छाजेड , भारतीय जैन संघटना जिला सचिव प्रफुल सोळंकी , संजय नहार,भारतीय जैन संघटना जिला अध्यक्ष अमोल तातेड, अनिल फिरोदिया, राहुल राकेचा,महेंद्र बोरा, राजेश गांधी आदिनीं महासतिजींना बधाई दिया है

Post a Comment

Previous Post Next Post