जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले गोर गरिबाचे कैवारी डॉ.भरत दारकुंडे सर्वांना मदत करतात. त्यांची टीम खूप चांगली आहे. त्यामुळेच मी या हॉस्पिटलला अपघातातील अथवा इतर पेशंट माझ्या रुग्णवाहिकेत आणत असतो. असे सांगून त्यांनी डॉक्टरांना दुसऱ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या हॉटेलमध्ये डॉ. अमोल भगत एम.बी.बी.एस. एम.डी. मेडिसिन, आणि डॉक्टर विशाल हारकर एम.बी.बी.एस. एम. एस. ऑर्थो असे डॉक्टर आणल्यामुळे प्रत्येक रुग्णांना ताबडतोब मदत मिळते आणि डॉक्टरांचे वैयक्तिक लक्ष असल्यामुळे रुग्ण समाधानी होऊन जातात. असेही श्री. कोठारी म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ. हारकर म्हणाले 'मी आत्ताच जामखेड मध्ये समर्थ हॉस्पिटलला जॉईंन केले आहे. कसल्याही प्रकारचे पेशंट आम्ही येथे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची टीम खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. डॉ. भरत दारकुंडे आणि डॉ. सोनाली दारकुंडे हे वैयक्तिक लक्ष देतात त्यामुळे दवाखान्यामध्ये गोरगरिबांना सेवा मिळते.
यावेळी बोलताना डॉ. भरत दारकुंडे म्हणाले मी दहा वर्षांपूर्वी जामखेडला ओम हॉस्पिटल ला जॉईन झालो होतो. त्यानंतर कोरोना सेंटर जामखेड मध्ये प्रथमता मी चालू केले त्यामध्ये बऱ्याच लोकांचे प्राण वाचवण्यात मला यश आले. तसेच मी दोन वर्षांपूर्वी समर्थ हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल चालू केले .सर्वांच्या मदतीने सर्व स्टाफ माननीय संजय काका कोठारी यांच्या सर्वांच्या मदतीने हॉस्पिटल व्यवस्थित चालले आहे. मी इथून पुढे चांगली सुविधा देईल.
यावेळी सचिन गाडे, रवींद्र बारस्कर ,संतोष कात्रजकर ,तनवीर मुलानी, विशाल ढवळे ,वैभव ढवळे,प्रथमेश विधाते ,हर्षल पोपळे, सचिन खामकर, जुबेर शेख ,संतोष शिरसागर ,माजीन शेख ,अनिकेत राऊत, कल्पना वसावे, रोहिणी दाहीतोंडे ,गोकुळ जाधव ,श्रीहरी चव्हाण आधी उपस्थित होते