जामखेड प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड येथे नवागत विद्यार्थ्यांचे शनिवारी मोठ्या उत्साहात व ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर या विद्यार्थीची सजवलेल्या बैलगाडीतून गावातून मिरवणूक काढण्यात आली.
शाळेच्या प्रवेशद्वारात आल्यानंतर विद्यार्थ्यांचं औक्षण करण्यात आले व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेचा पहिला दिवस म्हणजे मोठ्या आनंदाचा उत्साहाचा आणि कौतुकाचा असा नावीन्यपूर्ण उपक्रमाने जिल्हा परिषद शाळेत साजरा करण्यात आला.
त्याचबरोबर इतरही शाळेतून वरच्या वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
आज नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरण सोहळ्याच्या या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य व पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री भोसले सर श्री प्रवीण शिंदे सर श्री सरोदे सर श्री साळुंखे सर श्री कोथमिरे सर श्री मधुरकर सर श्री इंगोले सर व श्रीमती जरे मॅडम व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले