प्रत्येकाने एक तरी झाड लावावे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी

जामखेड प्रतिनिधी
५ जून या जागतिक पर्यावरण दिना निमित्त कोठारी प्रतिष्ठान जामखेड आणि वनविभाग याच्या संयुक्त विद्यमाने जामखेड बीड मार्गावरील सौताडा घाट माथ्यावरील डोंगर राईत वृक्ष लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले. 

गेली अनेक वर्षापासून कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या माध्यमातुन आत्तापर्यंत हजारो झाडाचे वृक्षारोपण केले गेले आहे तसेच वनविभागाचे  वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके आणि वन कर्मचारी  यांच्या मार्गदर्शनाखाली पाच जुन या जागतीक पर्यावरण दिनाचे औचीत्य साधत आजही सैताडा घाट येथे वृक्षारोपन करून वृक्ष लागवड करण्यात आली दर वर्षी न चुकता कोठारी यांच्या वतीने हा कार्यक्रम घेतला जातो यावर्षी या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, उद्योगपती प्रवीणशेठ छाजेड, राहुल घोरपडे, वनपाल आर. एम. भोसले, वनरक्षक प्रवीण उबाळे, रवी राठोड, शांतिनाथ सपकाळ, किसन पवार सह वनकर्मचारी शामराव डोंगरे ,भाऊसाहेब भोगल, दादासाहेब लहाने ,शरद सूर्यवंशी  आदि उपस्थित होते. 

उपस्थित सर्वाच्या हस्ते अनेक वृक्षाची लागवड करण्यात आली तसेच प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले पाहीजे असा सदेश सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी यावेळी देत
 गेले ३५ वर्षापासून आम्ही वृक्षारोपण करत आहोत प्रत्येक झाडास आम्ही पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था करत असतो आणि संगोपन सुद्धा करतो आज उन्हाची तीव्रता पाहता प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजेत आणि त्या झाडाचे संगोपन केले पाहिजे कारण दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असुन गतवर्षी सुद्धा उन्हाची तीव्रता खुपच जास्त प्रमाणात असल्याने आमच्या जैन समाजाचे अनेक साधुसंत उष्मा घाताने मृत्यू मुखी पडल्याच्या काही घटना घडल्या आहेत त्यामुळे तापमान घटवण्यासाठी आणि जनसामान्याच्या हितासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी स्पष्ट करत सर्वांना किमान एक वृक्षाची तरी लागवड करण्याचा संदेश दिला तर यावेळी वन विभागाचे अधिकारी प्रविण उबाळे यांनी संजय कोठारी आमच्या सर्व टीमला नेहमीच सहकार्य करत असल्याचा उल्लेख करत आजही आणि पुढील काळात ही आम्ही त्यांच्या प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात गरज असेल त्या ठिकाणी वृक्ष लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Post a Comment

Previous Post Next Post