केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत तेलंगशी शाळेची उत्तुंग भरारी

वैयक्तिक स्पर्धेत 11 स्पर्धकांची तर सांघिक स्पर्धेत 5 संघाची तालुकास्तरासाठी निवड

जामखेड प्रतिनिधी 
तेलंगशी  येथे पार पडलेल्या केंद्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत  जि.प.प्रा.केंद्र शाळा तेलंगशी या शाळेने उत्तुंग भरारी घेत दणदणीत विजय मिळवला आहे.या स्पर्धेचे उद्घाटन खर्डा बीटचे विस्तारअधिकारी संजय नरवडे ,तेलंगशी गावचे सरपंच दिगंबर ढाळे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रेवननाथ ढाळे यांच्या हस्ते संपन्न झाले.शाळा व्यवस्थापन समितीने लोकसहभागातून शाळेस दर्जेदार क्रीडांगण उपलब्ध करुन दिले आहे हा आदर्श व कौतुकास्पद उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या शारिरीक विकासासाठी खेळ महत्त्वाचे असून शिक्षक व पालक यांनी खेळाकडे अधिक लक्ष देण्याची  गरज आहे असे मत खर्डा बीटचे विस्तारअधिकारी संजय नरवडे यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी मुख्याध्यापक रुपेश वाणी व  संतोष गोरे यांच्यासह ग्रा.पं.सदस्य भरत ढाळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक बाळासाहेब पाटील, अण्णा काळे,तुकाराम जाधव,मुकेश मोरे,विजय जाधव,अमोल शिरोळे,बाबुराव गायकवाड,बलु ढाळे,श्रीराम ढाळे,सागर जायभाय,गणेश ढाळे,योगिराज मोरे,अगस्ती कातोरे,महेंद्र ढाळे,विश्रांत मोरे,महेश मोरे,दत्ता शिरोळे,श्रीकांत मोरे,महादेव पारखे यांच्यासह अनेक पालकांची स्पर्धा पाहण्यासाठी लक्षणीय उपस्थिती होती.या स्पर्धेत 11 वैयक्तिक तर सांघिक 5 प्रथम क्रमांक असे 16 बक्षिसे  तेलंगशी शाळेस मिळाली असून केंद्रात ही शाळा क्रीडा स्पर्धेत अव्वल ठरली आहे.

स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे
स्पर्धा निकाल (प्रथम क्रमांक खालीलप्रमाणे)
वैयक्तिक स्पर्धा स्पर्धा क्र.1 धावणे  (लहान गट मुले)
अनिश पांडुरंग मोरे..5वी..प्रथम,
 (लहान गट मुली)
तृप्ती बाळासाहेब पाटील.5वी प्रथम,
(मोठा गट मुले)
तेजस सुखदेव मोरे..6वी प्रथम,
(मोठा गट मुली)
ज्ञानेश्वरी हिरालाल जायभाय 7वी प्रथम,स्पर्धा क्रमांक 2 लांब उडी
(लहान गट मुले)
अनिश पांडुरंग मोरे..5वी प्रथम,
(लहान गट मुली)
तृप्ती बाळासाहेब पाटील..5वी प्रथम,
(मोठा गट मुली)
ज्ञानेश्वरी हिरालाल जायभाय 7वी..प्रथम,स्पर्धा क्रमांक 3 उंच उडी (मोठा गट मुले)
गणेश केशव जायभाय.7वी प्रथम,
(मोठा गट मुली)
ज्ञानेश्वरी हिरालाल जायभाय.7वी प्रथम,स्पर्धा क्रमांक 4 गोळा फेक
(मोठा गट मुली)
शिवकन्या रमेश जायभाय.6वी प्रथम,स्पर्धा क्रमांक 5 थाळी फेक
(मोठा गट मुले)
संग्राम दादा जायभाय..7वी प्रथम,
सांघिक खेळ स्पर्धा प्रकार 6 खो-खो
(लहान गट मुली)
जि.प.प्रा.केंद्र शाळा तेलंगशी .प्रथम
(मोठा गट मुले)
जि.प.प्रा.केंद्र शाळा तेलंगशी प्रथम,
(मोठा गट मुली)
जि.प.प्रा.केंद्र शाळा तेलंगशी प्रथम,
स्पर्धा प्रकार 7 कबड्डी
(मोठा गट मुले)
जि.प.प्रा.केंद्र शाळा तेलंगशी प्रथम,
(मोठा गट मुली
जि.प.प्रा.केंद्र शाळा तेलंगशी प्रथम,
द्बितीय क्रमांक 
एकूण 3 बक्षिसे लांब उडी
(मोठा गट मुले) 
गणेश केशव जायभाय ..7वी द्वितीय,
गोळा फेक
(मोठा गट मुले)
संग्राम दादा जायभाय ..7वी द्वितीय,
कबड्डी
(लहान गट मुले)
जि.प.प्रा.केंद्र शाळा तेलंगशी द्वितीय,
तृतीय क्रमांक एकूण 2 बक्षिसे
उंच उडी
(लहान गट मुले) 
अनिश पांडुरंग मोरे 5वी तृतीय,
थाळी फेक
(मोठा गट मुली)
ज्ञानेश्वरी हिरालाल  जायभाय ..7वी तृतीय,
एकूण 21 बक्षिसे

 स्पर्धकांना मुख्याध्यापक संतोष गोरे, सुशेन चेंटमपल्ले,विजयकुमार रेणुके,लक्ष्मी जायभाय,अशोक जाधव,रविंद्र धस,विकास पाचरणे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल जामखेड तालुक्याचे गटविकासअधिकारी शुभम जाधव,गटशिक्षणाधिकारी कैलास खेरे,विस्तारअधिकारी संजय नरवडे व जालिंदर खताळ,केंद्रप्रमुख केशव गायकवाड यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रेवननाथ ढाळे  व सर्व सदस्य,सरपंच दिगंबर ढाळे व सर्व सदस्य,माता व पालक यांनी शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post