महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
जामखेड तालुक्यातील राजुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींना, “राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत” तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे मुलींनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमामुळे त्यांना व्यायामाचे महत्त्वही पटले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत Skill tree Consulting Private Limited या संस्थेच्या सहयोगाने व त्या त्या भागातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या व संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०,२५९ उच्च माध्यमिक आणि १२७९ माध्यमिक शाळांमध्ये मुलींसाठी 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा' कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य, जीवनशैली, व्यायामाचे महत्त्व या बाबत मुलींमध्ये आवड निर्माण व्हावी याकरिता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत Taekwondo, Wushu, Karate, Judo, Western boxing, kickboxing, muay thai, jiu - jitsu/jujutsu, krav. Maga Aikido, Jee Kune Doforand, व इतर भारतीय मार्शल आर्ट या खेळांचा समावेश करून मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून गटविकास अधिकारी श्री.प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी श्री.कैलास खैरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.सुरेश कुंभार,यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील ३४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे.
जामखेड तालुक्यातील राजुरी या केंद्रातील राजुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख श्री. संजय घोडके सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री माजिद शेख सर, श्री नाना मोरे सर, श्री महेश थोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे. शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री वैभव कोल्हे यांचेही या कामी विशेष सहकार्य लाभले आहे.
आत्मरक्षा प्रशिक्षण योजनेचे जामखेड तालुकाप्रमुख तथा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन बारगजे हे या शाळेतील मुलींना तायक्वांदो चे प्रशिक्षण देत आहेत. त्याचबरोबर त्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करत आहेत. व त्यांच्या सक्षमीकरणासाठी परिश्रम घेत आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये इतर शाळेवर अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सहसचिव अल्ताफ कडकाले, ज्ञानेश्वर जमदाडे, कु. तनिष्का डाडर संकेत जमदाडे हे सर्व प्रशिक्षक हा उपक्रम राबवित आहेत. या प्रशिक्षणामध्ये मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी येथे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजना अंतर्गत मुलींना स्वसंरक्षणासाठी व आत्मविश्वास जागृती करीता तायक्वांदो प्रशिक्षण सुरू आहे.
ग्रामीण भागातील मुलींना अशा प्रकारे सुविधा प्रथमतः च मिळत असल्याने मुलींमध्ये कमालीची उत्सुकता व सहभागी होण्याची धडपड दिसून येते आहे. मुली एकही क्लास चुकवत नाही. किक व पंच चे अचूक प्रात्यक्षिक मुली आत्मसात करत आहेत. यासाठी श्री संतोष बारगजे सर (सचिव अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशन) विशेष परीश्रम घेत आहेत. प्रशिक्षक श्री सचिन बारगजे हे देखील अतिशय कुशलतेने विद्यार्थ्यांनीना धडे देत आहेत.अशी संधी ग्रामीण विद्यार्थ्यांनीना मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद चे हार्दिक आभार.
मुख्याध्यापक श्री शेख माजीद सर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी
जाहिरात 🔽
Tags
क्रिडा
