राष्ट्रीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत नगरच्या वैष्णवी कदमने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत ब्राँझपदक पकाविले आहे. राष्ट्रीय स्पर्धा हैदराबाद येथे पार पडली.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या (टीएफआय) मान्यतेने तेलंगणा तायक्वांदो असोसिएशन व तेलंगणा ऑलिम्पिक असोसिएशन यांच्यातर्फे राष्ट्रीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धा 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण 24 राज्यांंनी सहभाग नोंदविला होता.
राष्ट्रीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळणारी नगरची वैष्णवी कदमने पहिल्या सामन्यात पश्चिम बंगालच्या खेळाडूचा सरळ एकतर्फे पराभव करत विजय मिळविला. या सामन्यात तिने 12 व 14 गुण घेतले. दुसरा सामना आसाम बरोबर झाला. यामध्ये तिने पहिला सेट 6-5 अशा एका गुणाच्या फरकाने जिंकला. तर दुसरा सेट 8-7 अशा एका गुणाने गमावला. तिसर्या सेटमध्ये तिने आत्मविश्वासाने दर्जेदार खेळकरत 4-2 अशा दोन गुणांची आघाडी घेत सामाना जिंकला. तिसर्या उपांत्य सामन्यात तिला विजय मिळविता आला नाही. पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार्या वैष्णवीने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत सर्वांची मने जिंकत महाराष्ट्राला ब्राँझपदक मिळवून दिले.
महाराष्ट्राचे मुलींचे प्रशिक्षक नेहा दास, तर व्यावस्थापक म्हणून मुकेश नाचरे यांनी काम पाहिले. मुलांचे प्रशिक्षक म्हणून ऋषिकेश खोमाने, शैलेश दास, पुमसे प्रशिक्षक नीलेश सावंत यांनी काम पाहिले. तिला शकील सय्यद, सुरेश वाघ, रवि यादव यांचे मागर्दशन लाभले. या स्पर्धेत नगरचे लक्ष्मण शिंदे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
खेळाडू व प्रशिकांचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, अहमदनगर जिल्हा तायक्वांदोचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, उपाध्यक्ष किरण बांगर, जिल्हा सचिव संतोष बारगजे, सहसचिव अलताफ कडकाले, सचिन आगळे, शकील सय्यद, सुरेश वाघ, दिनेश राजपूत, महादेव मगर, अंबादास साठे, गोरक्षनाथ गालम, महेश मुरादे, संतोष परांडे, बाबा क्षीरसागर, सुरज शिंदे, अक्षय चंदन, विशाल जंजाळ, अक्षय साळुंखे, सागर सानप आदींनी अभिनंदन केले.
Tags
क्रिडा
