आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क: दि. २४
कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून विकास कामांचा धडाका गतिमान झाला आहे. जामखेड शहरातील नागरिकांसाठी महत्वपूर्ण असलेल्या सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी शासन दरबारी पाठपुराव्याला यश मिळाले आहे. जामखेड शहरासाठी सांस्कृतिक सभागृहास 5 कोटी रूपये मंजुरी मिळाली आहे. तसा शासन निर्णय सरकारच्या नगरविकास विभागाने जारी केला आहे.
जामखेड शहरातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी हक्काची जागा असावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. या मागणीनुसार जामखेड शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्याकडे शहरात भव्य सांस्कृतिक सभागृह उभारावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. आमदार राम शिंदे यांनी तातडीने या मागणीची दखल घेत शासन दरबारी पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे.
श्रीनागेश्वर मंदिरा जवळ नव्या नगरपरिषदेच्या शेजारी हे सभागृह होणार आहे व त्यास स्व.
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सांस्कृतिक सभागृह असे नाव देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
जाहिरात 👇
Tags
राजकीय