महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय सब ज्युनियर क्योरुगी आणि पुमसे तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ कटक (ओडिशा) येथे दाखल झाला असून तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने कटकच्या जे. एन. इनडोअर स्टेडियममध्ये 25 ते 27 मार्च दरम्यान राष्ट्रीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केले आहे.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) या राज्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील पुढील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे व सर्व खेळाडू प्रशिक्षक व व्यवस्थापक यांना संघटनेच्या खर्चाने ओडिशा येथे पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्राचा संघ मुले : वियान दिघे (पुणे), यश भारत पस्ते (मुंबई उपनगर), आर्यन शांताराम वानखेडे (जळगाव), सार्थक राजू निमसे (नगर), सोहम सुदेश खामकर (रत्नागिरी), मोहंमद झैद वसीम हमदुले (रत्नागिरी), तनिष्क सुनील सागवेकर (मुंबई), कृष्णा जाधव (पुणे), श्रीधर मोहिते (पुणे), अर्णव बावडकर (पुणे), वेद वि. मोरे (रायगड), रोनित प्रणाम जाधव (ठाणे), सौम्या एस. दास (मुंबई उपनगर), विघ्नेश गायकवाड (पुणे).
मुली : सुरभी राजेंद्र पाटील (रत्नागिरी), अनन्या अच्युतराव रणसिंग (नगर), वैष्णवी नीलेश बेरड (नगर), प्रियांका प्रकाश मिसाळ (नगर), श्रावणी अच्युतराव रणसिंग (नगर), संचिता एस. घाणेकर (मुंबई), साजिया मोहम्मद हुसेन शेख (नगर), सार्थ संजय ठाकूर (मुंबई), स्वरा संतोष नितोरे (पालघर), आर्या मनीष काळे (अमरावती), तमसीन वाजिद शेख (सोलापूर), शेजल श्रीमल (पुणे), उज्ज्वला मरगळे (पुणे), पुमसे संघ : अर्णव दिलीप जगताप (ठाणे), तनिष्का वेल्हाळ (मुंबई), ग्रेसन अंकुर गावित (ठाणे), राधिका ऋषिकेश भोसले (ठाणे), शौर्य धनंजय जाधव (ठाणे), अर्णव दिलीप जगताप (ठाणे), आर्या चव्हाण (मुंबई), प्रतिती देसाई (मुंबई).
मुलांच्या संघाचे प्रशिक्षक प्रशांत टी. कांबळे, संघ व्यावस्थापक म्हणून जळगावचे अजित घारगे, मुलींचे प्रशिक्षक म्हणून अहमदनगरचे दिनेशसिंग राजपूरत. पुमसे संघाचे प्रशिक्षक म्हणून रॉबिन वॉल्टर मेनेझेस. यांना 'ताम' च्या वतीने खेळाडूंसोबत पाठविण्यात आले आहे.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई या राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम प्रवीण बोरसे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार वेंकटेश कररा, नीरज बोरसे, सतीश खेमसकर बालाजी पाटील जोगदंड आदींनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
ad