महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
कटक (ओडिशा) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर क्योरुगी आणि पुमसे तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी चमकदार कामगिरी करून एक सुवर्ण, एक रौप्य तर दोन कांस्यपदके जिंकली. तर पुमसेत महाराष्ट्राने एक रौप्यपदक पटकावले.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने कटकच्या जे. एन. इनडोअर स्टेडियममध्ये 25 ते 27 मार्च दरम्यान राष्ट्रीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.या स्पर्धेत पहिल्याच दिवशी पालघरची स्वरा संतोष नितोरे हीने 35 किलो वजन गटात महाराष्ट्राला सुवर्ण पदक जिंकून दिले. मुंबईच्या संचिता एस. घाणेकर हीने 26 किलो वजन गटात रौप्यपदक मिळविले. अहमदनगरची वैष्णवी नीलेश बेरड, (20 किलो) व पुण्याची शेजल श्रीमल (47 किलो),या दोघांनी कांस्यपदक पटकावले.
पदक विजेत्या खेळाडूंचे व संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) या राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम व प्रवीण बोरसे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार वेंकटेश कररा, नीरज बोरसे, सतीश खेमसकर बालाजी पाटील जोगदंड आदींनी पदक विजेत्या खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे व उर्वरित खेळाडूंसाठी शुभेच्छा दिल्या आहेत संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
ad
Tags
क्रिडा


