"प्रजासत्ताक दिन" या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यामुळे श्री नागेश शाळेचे व जामखेडचे देशपातळीवर नावलौकिक झाले ही अभिमानास्पद बाब आहे' असे प्रतिपादन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले.
"प्रजासत्ताक दिन " हे नाव जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयाने साकारले आहे. हे नाव मानवी रचनेतील देशातील सर्वात मोठे ठरले आहे. त्यामुळे त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने देण्यात आलेल्या मेडल प्रमाणपत्र वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी अध्यक्षस्थानी जामखेडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश चंद्रे होते यावेळी बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले.
यावेळी , नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे,स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, रा काँ प्रदेशाचे सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कन्या स्कूल कमिटी व कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले,विनायक राऊत, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी, उपस्थित होते.
नागेश विद्यालयाचे प्राचार्य बी के मडके यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली. कलाशिक्षक तथा ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी हे नाव साकारले. यावेळी नागेश विद्यालयाचे 500 विद्यार्थी व कन्या विद्यालयाच्या 500 विद्यार्थीनी असे 1000 विद्यार्थी व एनसीसी कॅडेट यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभाग घेतला. याची नोंद भारत सरकारच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड घेतली आहे.
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय येथे हा कार्यक्रम सुरू झाला.
तहसीलदार योगेश चंद्रे पुढे म्हणाले "रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून जामखेडच्या वैभववाद नक्कीच भर पडणार आहे तसेच शाळेचे, संस्थेचे व गावाचे नाव देशपातळीवर चमकले आहे. ही बाब जामखेडकरांसाठी अभिमानास्पद आहे. जामखेडच्या वैभवात नागेश विद्यालयने मानाचा तुरा रोवला आहे" असे म्हणून त्यांनी यामध्ये सहभागी असलेले सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले.
नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे आपल्या भाषणात म्हणाले," मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे या शाळेतील प्राचार्य ,शिक्षक, विद्यार्थी , एनसीसी कॅडेट,नेहमीच रयत शिक्षण संस्थेचे नाव देशपातळीवर कसे येईल याचा प्रयत्न करत असतात. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये शाळेची नोंद झाली या माध्यमातून सिद्ध होते. मी रयतचा विद्यार्थी असून रयत संस्थेच्या व्यासपीठावरून रयत संस्थेचा गौरव होत आहे याचा अभिमान वाटत आहे."
प्रा. मधुकर राळेभात यावेळी बोलताना म्हणाले " रयत शिक्षण संस्थेचे नागेश विद्यालय चे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली याची प्रेरणा आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाली या विश्व रेकॉर्डमुळे आपल्या शाळाने देशपातळीवर नाव नोंदवले आहे मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे म्हणून मला फार कौतुक वाटत आहे".
यावेळी प्राचार्य बी. के. मडके यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले" आमदार रोहित पवार यांनी विद्यालयात राजमाता जिजाऊंचे सगळ्यात मोठे रेखाचित्र साकार केले. त्या प्रेरणातून आम्ही हा उपक्रम केला, नागेश विद्यायाचे भव्य मैदान पाहून मनामध्ये संकल्पना आली की आपण देशभक्तीचा उपक्रम 'प्रजासत्ताक दिन' हे नाव विद्यालयात साकार करावे कलाशिक्षक मयूर भोसले यांनी हे नाव विद्यार्थी व शिक्षकांच्या मदतीने प्रत्यक्षात साकार केले. आमच्या मनी ध्यानी नसताना हे नाव देशातील व जगातील सर्वात मोठे झाले.
कला शिक्षक एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांनी याविषयी माहिती देताना सांगितले "आमदार रोहित पवार यांच्या प्रेरणेतून प्राचार्य मडके बी के यांच्या संकल्पनेतून प्रजासत्ताक दिन नाव साकारण्यात आले. अवघ्या अर्ध्या तासांमध्ये हे नाव तयार झाले आहे या नावात नागेश चे 500 व कन्या विद्यालयाचे 500 विद्यार्थी व सतरा महाराष्ट्र बटालीयचे एनसीसी कॅडेट व शिक्षक हे सहभागी झाले याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे, हा माझा सन्मान देशाचे सैनिक व शहीद जवान गणेश कृष्णाजी भोसले यांना समर्पित करत आहे"
यावेळी ग्रामसेवक जिल्हाकार्याध्यक्ष युवराज ढेरे पाटील, केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते, कृष्णाजी भोसले ,शिवाजीराव ढाळे, पर्यवेक्षक संजय हजारे, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, कॅप्टन गौतम केळकर, गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, बाबासाहेब घोलप , संतोष पवार,गोपाल बाबर,शैलेंद्र मानकर, नागेश व कन्या विद्यालय सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी व एनसीसी कॅडेट उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेचे नागेश विद्यालयाचे नोंद इंडिया बँक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याबद्दल कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार, उत्तर विभागाचे सल्लागार अध्यक्ष आमदार आशुतोष काळे मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मिनाताई जगधने व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राजेंद्र फाळके, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, काकासाहेब वाळुंजकर ,शिवाजीराव तापकीर , सतरा महाराष्ट्र बटालियनचे सी ओ कर्नल चेतन गुरुबक्ष, ए ओ लेफ्टनंट कर्नल रणदीप सिंग यांनी विशेष अभिनंदन केले.तसेच संपूर्ण जामखेडकरांच्या वतीने जामखेड चे नाव देशपातळीवर चमकल्यामुळे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी इंगळे तर आभार प्रदर्शन शंभूलाल बडे यांनी केले
ad