राज्य तायक्वांदो स्पर्धेत नगरला सहा सुवर्ण पाच रौप्यपदकांसह स्पर्धेचे उपविजेतेपद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
    रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण (ता.चिपळूण) येथे पार पडलेल्या. महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याच्या संघाने. दमदार कामगिरी करत 6 सुवर्ण व 5 रौप्यपदकांसह स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले. 
    तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई च्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो असोशिएशन च्या वतीने 17 ते 19 मार्च 2023 दरम्यान महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने 13 मुली व 9 मुले सहभागी झाले होते. 
    त्यापैकी सार्थक राजू निमसे (नगर),अनन्या अच्युतराव रणसिंग (नगर),प्रियांका प्रकाश मिसाळ (नगर),वैष्णवी नीलेश बेरड (नगर),श्रावणी अच्युतराव रणसिंग (नगर),साजीया मोहमदहुसेन शेख (राहाता), या सहा खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत सुवर्णपदके मिळवली. 
तर रुद्रा नरेंद्र उडता (संगमनेर), संयुक्ता राजेश पसकंटी (नगर),सलोनी उमेश प्रसाद (नगर),ज्ञानेश्वरी भरत रोडे (नगर),वीरा राहुल विखे (राहाता). या पाच खेळाडूंनी रौप्यपदक पटकाविले. 
    जिल्हा संघटनेच्या वतीने खेळाडूंसोबत दिनेशसिंह राजपूत व रवी यादव यांना प्रशिक्षक तर महेश टेमक यांना व्यवस्थापक म्हणून ठेवले होते. त्याचबरोबर साईनाथ वाकडे व प्रतीक्षा देवरे यांना या स्पर्धेसाठी संघटनेने पंच म्हणून पाठविले होते.
    सर्व यशस्वी खेळाडूंना सुरेश वाघ, शकील सय्यद, दिनेश राजपूत, गणेश धिवर, रवी यादव, महेश मुरादे, लक्ष्मण शिंदे व महेश टेमक यांचे मार्गदर्शन लाभले. 
    या सर्व गुणवंत खेळाडूंचे तायक्वांदो असोशिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश कर्रा, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा तामचे उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे सचिव संतोष बारगजे सहसचिव अल्ताफ कडकाले, उपाध्यक्ष किरण बांगर, शंकर जेधे अंबादास साठे, बाबासाहेब क्षिरसागर, गोरक्ष गालम, सचिन आगळे, संतोष परांडे यांनी अभिनंदन केले. 
ad


Post a Comment

Previous Post Next Post