राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी नगरचा संघ रवाना


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
  राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा संघ रात्री रवाना झाला. या स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण (ता.चिपळूण) येथे आयोजित केल्या आहेत. 
  17 ते 19 दरम्यान राज्य स्पर्धा आयोजित केली असून, या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या मान्यतेने राहता तालुका तायक्वांदो असोसिएशनतर्फे जिल्हा स्पर्धा लोणी येथे घेण्यात आली. या स्पर्धेतून जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. 
ad⤵️ निवडलेला संघ मुले : रुद्रा नरेंद्र उडता (संगमनेर), सिद्धार्थ लक्ष्मण खेडकर (पाथर्डी), सार्थक राजू निमसे (नगर), सिद्धांत संदीप त्रिपाठी (नगर), ओंकार दिलीप खोबरे (राहाता), साई भारत हळनोर (राहाता) गौरव देविदास काळपुंड (नगर), अंश आनंद बंग (नगर), कृष्णा दत्तात्रय दिघे (राहाता) प्रज्योत प्रमोद चव्हाण (राहाता), रोहित ज्ञानराम कुमावत (संगमनेर), यश संतोष गावठे (राहुरी) 
मुली : संयुक्ता राजेश पसकंटी (नगर), अनन्या अच्युतराव रणसिंग (नगर), वैष्णवी नीलेश बेरड (नगर), प्रियांका प्रकाश मिसाळ (नगर), श्रावणी अच्युतराव रणसिंग (नगर), सलोनी उमेश प्रसाद (नगर), साजीया मोहमदहुसेन शेख (राहाता), ज्ञानेश्वरी भरत रोडे (नगर), ईश्वरी भरत रोडे ( नगर), अक्षदा सुरेश धनवडे (नगर), आणवी विजय शिंगारे (राहाता), आर्या नीलेश दळे (राहाता), वीरा राहुल विखे (राहाता).

Post a Comment

Previous Post Next Post