जैन श्रावक संघ जामखेड मार्फत सालाबाद प्रमाणे भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक (जयंती )४ एप्रिल २०२३रोजी करण्यात येणार आहे सकाळी ८:०० वाजता जैन स्थानकापासून सवाद्य मिरवणूक जैन बांधवांच्या सर्व महिला- पुरुष -बाळगोपाळांच्या उपस्थितीत निघणार आहे जैन स्थानकापासून जयहिंद चौक ते जुने पोलीस स्टेशन पासून कोर्ट रोड ते मेन रोड असा मिरवणूकीचा मार्ग असेल. जैन स्थानकात मिरवणूक ची सांगता होईल. नंतर भगवान महावीरांबद्दल बरेच जण विचार मांडणार आहेत त्यानंतर महावीर भवन येथे जैन श्रावक संघा तर्फे १२ ते २ महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच या दिवशी सायंकाळी ७:३०ते १०:००वाजेपर्यंत पाठशाळेतील लहान मुला-मुलींचे धार्मिक कार्यक्रम होतील. अशी माहिती जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी आणि जैन संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी आनी श्रावक संघांचे पदाधिकारी यांनी दिली
भगवान महावीर जयंती निमित्त जामखेडला विविध कार्यक्रमांचे आयोजन
संपादकसंतोष बारगजे
-
0