माझे गुरु माझ्यासाठी सर्वस्व- रामचंद्र महाराज शिंदे

जामखेड प्रतिनिधी

स्वतःचे कल्याण करायचे असेल तर नामस्मरण केले पाहिजे. गुरुमुखातून प्राप्त झालेल्या मंत्राचे उच्चारण केले पाहिजे. मी माझ्या गुरु मध्येच देव पाहतो. माझे गुरुच माझ्यासाठी सर्वस्व आहेत. असे प्रतिपादन ह.भ.प. रामचंद्र महाराज शिंदे यांनी केले. 

सोमवारी जामखेड शहरातील जटाशंकर मंदिर येथे ह.भ.प. रामचंद्र महाराज शिंदे यांची कीर्तन सेवा झाली. यावेळी त्यांनी 

संत नामदेव महाराज यांच्या 'नाशवंत देता ब्रम्ह येईल हाता' या अभंगावर कीर्तन केले. यावेळी परिसरातील लोकांनी हजेरी लावली होती. यावेळी आलेल्या भक्तांची भोजनाची सोय केली. 

 श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या प्रेरणेने व त्यांचे शिष्यह.भ.प, दादासाहेब महाराज सातपुते यांच्या संकल्पनेतून जमादारवाडी जामखेड येथील संत वामनभाऊ गडाच्यावतीने प्रत्येक सोमवारी एका महादेव मंदिरात कीर्तन परंपरा सुरू करण्यात आली आहे. गेल्या दिड वर्षापासून प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार श्री नागेश्वर मंदिर, दुसरा सोमवार जटाशंकर मंदिर महादेव गल्ली , तिसरा सोमवार श्री शैल्य मल्लिकार्जुन मंदिर सुतारनेट, व चौथ्या सोमवारी वैतरणा नदीतील श्री तपनेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी परिसरातील कीर्तनकारांची कीर्तने होतात तसेच ज्या ज्या ठिकाणी कीर्तन होतात त्या त्या ठिकाणची भक्तमंडळी फराळाची जेवणाची व्यवस्था करतात. ज्यांचे वाढदिवस असतात असे लोक आपल्या मुला-मुलींच्या वाढदिवसानिमित्त येथे अन्नदानाची सेवा देतात. 


परीसरातील भजनी मंडळे व श्री नागेश्वर भजनी मंडळाच्या वतीने या कार्यक्रमांमध्ये सात संगत केली जाते. यामध्ये सर्वश्री ह.भ.प, दादासाहेब सातपुते, हरिदास गुंड, जगन्नाथ धर्माधिकारी, संतोष बारगजे, महारुद्र नागरगोजे, संतोष राळेभात पाटील, सिध्धेश शिंदे, दत्ता म्हेत्रे, त्र्यंबक वराट, मुरलीधर काळे, राऊत तात्या शेषराव मुरुमकर, नारायण काळे, बाळासाहेब गाडे महाराज, विवेकानंद महाराज मंजरतकर, रामचंद्र महाराज शिंदे, राजेंद्र महाराज म्हेत्रे, आदी महाराज मंडळींची कीर्तन सेवा तसेच सात संगत असते.

सुरू असलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून पंचक्रोशीतील भक्तांनी या उपक्रमात सहभागी व्हावे व काही ना काही सेवा द्यावी असे आवाहन यानिमित्ताने श्री शिंदे महाराज यांनी केले आहे.

दर महिन्याच्या वद्य द्वादशीला वामनभाऊ गड जमादारवाडी येथे रात्री सात ते नऊ कीर्तन सेवा व नंतर आलेल्या सर्वांना महाप्रसादाची सोय केलेली असते. येत्या गुरुवारी श्री. संतोष बारगजे यांचे कीर्तन होणार आहे व नंतर महाप्रसाद होईल या किर्तन सेवेचा पंचक्रोशीतील भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन दादासाहेब महाराज सातपुते यांनी केले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post