महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
खर्डा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे माजी प्राचार्य भाऊसाहेब ढोबे सर यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्ष होते
खंडेश्वरी टाकळी तालुका कर्जत येथील मूळ रहिवासी असलेले भाऊसाहेब ढोबे सर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड या ठिकाणी अनेक वर्ष सेवा केली. त्यानंतर खर्डा येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. व 2016 साली तेथेच सेवानिवृत्त झाले. गेल्या काही महिन्यापासून ते आजारी होते. रात्री अचानक त्यांना त्रास होऊ लागल्याने जामखेड येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यादरम्यान पहाटे त्यांचे निधन झाले.
त्यांच्यामागे पत्नी एक मुलगी दीपक व सागर हे दोन मुले असा परिवार आहे आज सकाळी त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.