सैनिकी विद्यालयाचा बारावीचा 98.83 टक्के निकाल, खो-खो, तायक्वांदो खेळाडूंना मिळाले अतिरिक्त क्रीडा गुण


बीड - नवगण शिक्षण संस्था, राजुरी नवगण संचलित सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल 98.83 टक्के लागला आहे. शाळेचे राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो खेळाडू रांजवन करण दत्ता व राज्यस्तरीय खो-खो खेळाडू लाटे रोहन रामचंद्र यांना राज्य स्पर्धेतील प्राविण्य व सहभागासाठी विशेष क्रीडा गुण मिळाले आहेत , अशी माहिती सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य डाके एस ए यांनी दिली.
        सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावी वर्गासाठी खुल्या तुकडीतील 44 विद्यार्थी व आदिवासी तुकडीतील 42 विद्यार्थी असे एकूण 86 प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 85 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थीनी यशाची परंपरा कायम ठेऊन घवघवित यश संपादन केले आहे. खुल्या तुकडीतील विद्यार्थी लाटे रोहन रामचंद्र (84.33%), रांजवन करण दत्ता ( 83.50 % ), कोकरे ( दीपक धर्मराज 81.17% ) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले आहेत. शाळेचे राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो खेळाडू रांजवन करण दत्ता व राज्यस्तरीय खो-खो खेळाडू लाटे रोहन रामचंद्र यांना राज्य स्पर्धेतील प्राविण्य व सहभागासाठी विशेष क्रीडा गुण मिळाले आहेत. आदिवासी तुकडीतील विद्यार्थी इरले ज्ञानेश्वर लिंबाजी (77.0%), वरकले वैभव राजाभाऊ (76.67 %), दुभाळकर वैभव अश्रुबा (75.33%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वीतिय व तृतीय क्रमांक पटकावले आहेत.
       या यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी मंत्री जयदत्त अन्ना क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर ,मार्गदर्शक डॉ.दीपाताई क्षीरसागर, युवा मार्गदर्शक डॉ.योगेशभैय्या क्षीरसागर तसेच संस्था प्रशासक श्री व्ही.आर. शिंदे सर, श्री देशमाने सर, श्री गुट्टे सर यांच्यासह सैनिकीचे प्राचार्य श्री श्याम डाके व सैनिकी विद्यालयाचे सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post