बाजार समितीचे सभापती व संचालकांचा कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
     जामखेड बाजार समितीचे सर्व  संचालक एक मताने शेतकरी हिताची काम करणार असल्याचा विश्वास बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती शरद कार्ले यांनी व्यक्त केला.

     जामखेड बाजार समितीच्या सभापतीपदी  शरद कारले आणि संचालक पदी सुरेश पवार तसेच राहुल बेदमुथा यांची निवड झाल्याबद्दल कोठारी प्रतिष्ठान मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रवीण चोरडिया  उपस्थित होते.

    यावेळी बोलताना सभापती शरद कार्ले म्हणाले, जामखेड बाजार समितीच्या माध्यमातून शेतक-यांसाठी नाविण्यपुर्ण योजना राबवण्याचा मानस आहे. हे करताना शेतकरी हिताला प्राधान्य देणार असून, जामखेड बाजार समितीचे नाव अहमदनगर जिल्ह्यात क्रमांक एकची करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

       सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपल्या भाषणात जामखेड बाजार समितीचे सभापती आणि संचालक म्हणून खूप मोठी जबाबदारी असल्याने सांगत, संधीचे सोन करावे असे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post