महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे. आज 13 खेळाडू मुंबईला रवाना झाले आहेत.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने मुंबई जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने मुंबई येथे 30 जून ते 1 जुलै दरम्यान 6 व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत करिता अहमदनगर जिल्ह्याचा संघ नुकताच जाहीर झाला आहे. अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने सैनिकी विद्यालय लोणी ता. राहता येथे ज्युनिअर व कॅडेट जिल्हा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे
मुले
चैतन्य शिरसाठ पाथर्डी
संकेत शिरसाठ पाथर्डी
कृष्णा चव्हाण संगमनेर
पार्थ अरगडे लोणी महेश
ऋषिकेश बडे संगमनेर
अथर्व कोरडे लोणी महेश
मुली
साजिया शेख बाभळेश्वर
रिद्धी दिघे बाभळेश्वर
श्रद्धा हाडोळे बाभळेश्वर
अनुष्का म्हस्के बाभळेश्वर
आरती खोबरे बाभळेश्वर
साईशा बेंद्रे बाभळेश्वर
हे सर्व खेळाडू आज मुंबईला रवाना झाले आहेत. खेळाडूंसोबत प्रशिक्षक म्हणून दिनेशसिंह राजपूत व निकिता लकारे (लोणी) तर व्यवस्थापक म्हणून सागर सानप (पाथर्डी) यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनच्या वतीने पंच म्हणून अलताफ कडकाले यांची निवड करण्यात आली आहे.
वरील सर्व खेळाडूंना लोणी येथील प्रशिक्षक महेश मुरादे, प्रभाकर शेळके, दिनेश राजपूत अमोल बोधक, ब्रम्हचैतन्य राजगुरु राहुरीचे प्रशिक्षक बाबासाहेब क्षीरसागर, पाथर्डी येथील अंबादास साठे, गोरक्षनाथ गालम, सागर सानप, संगमनेरचे प्रशिक्षक लक्ष्मण शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या सर्व खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव - मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, सचिव - सुभाष पाटील, खजिनदार - वेंकटेश कररा, धुलीचंद मेश्राम, नीरज बोरसे, अजित घारगे, सतिश खेमस्कर
अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, उपाध्यक्ष किरण बांगर, सचिव संतोष बारगजे, सहसचिव अल्ताफ कडकाले, यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.