जामखेडहून श्रीक्षेत्र धाकटी पंढरी धनेगाव कडे दिंडीचे प्रस्थान , बुधवारी आ. रोहित पवार यांच्या हस्ते होणार महापुजा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
 "सालावादाप्रमाणे श्रीक्षेत्र धाकटी पंढरी धनेगाव येथे जाणारी दिंडीचे आज बुधवार दि. २८ जून रोजी सकाळी ठीक १०:०० वाजताचे सुमारास जामखेड शहरातील मोरे वस्ती येथील श्रीकृष्ण मंदिर येथून विधीवत पुजा करून प्रस्थान झाले. ही दिंडी उद्या दि. २९ रोजी धनेगाव येथे पोहचणार असून आ. रोहित पवार, प्रा. मधुकर राळेभात, प्रा. सचिन सर गायवळ व अमोल राळेभात यांच्या हस्ते उद्याची महापुजा संपन्न होणार आहे.  
   ज्या वारकर्‍यांना पंढरपुरला जाणे शक्य झाले नाही अशा सर्व भक्तांकरिता धाकटी पंढरी म्हणून समजले जाणारे धनेगांव या ठिकाणी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. 
   जामखेड ते धनेगांव पायी दिंडी सोहळ्याचे 
हे १७ वे वर्ष आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या सर्व संत सज्जनाच्या कृपाशिर्वादाने  व  अभिमन्यु पवार यांच्या हस्ते श्रीकृष्ण मुर्तीची पुजा करून दिंडीचे श्रीकृष्ण मंदिर, जामखेड येथुन प्रस्थान झाले. 
आज प्रस्थान झालेल्या दिंडी मध्ये आयोजक प्रा. मधुकर राळेभात यांच्यासह आबासाहेब वीर, कॅप्टन लक्ष्मण भोरे, लक्ष्मण अंकुश, नगरसेवक डिगांवर चव्हाण, पवनराजे राळेभात, अमित जाधव, जगदाळे गुरूजी, महादेव पोकळे, दत्तात्रय डूचे महाराज,
मृदुंगाचार्य वाघ, महादेव पोकळे, थोरात टेलर, शहाजी राळेभात, दादासाहेब शिंदे, दादा रिटे, पिंटू बोरा, प्रशांत राळेभात, सुनील वारे आदिंसह मोठ्या संख्येने भाविक व महिला वारकरी मोठ्या संख्येने सहभाग आहे.


Post a Comment

Previous Post Next Post