संत वामनभाऊ महाराज यांच्या दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान



जामखेड प्रतिनिधी 
    संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे रविवारी (18 जून) दुपारी पालखीपंढरपुर कडे प्रस्थान होईल. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत हभप श्री. विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथुन संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीबरोबर दरवर्षी जवळपास 30 ते 40 हजार वारकरी दिंडीत सहभागी होत असतात.

रविवारी सकाळी श्रीगहिनीनाथ महाराज व संत वामनभाऊ महाराज यांचा गुरुपरंपरेनुसार अभिषेक होईल त्यानंतर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे दुपारचे भोजन झाल्यानंतर दुपारी दोन ते चार दरम्यान गहिनीनाथ गड येथून अतिशय उत्साहात या भव्यदिंडीचा प्रवास सुरू होईल. व निवडुंगा येथे पहिला मुक्काम होईल. सोमवारी 19 जूनला वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी असा प्रवास करून मातकुळी ता. आष्टी येथे दींडीचा दुसरा मुक्काम होईल. मंगळवारी 20 जूनला जांबवाडी जामखेड जगदाळे वस्ती असा प्रवास झाल्यानंतर संत वामनभाऊ गड जमादारवाडी येथे दिंडीचे पहिले गोल रिंगण होईल व सारोळा येथे दींडीचा मुक्काम होईल. 
बुधवारी 21 जूनला सारोळा वस्ती, खुर्दैठण, घोडेगाव, आपटी, पिंपळगाव वस्ती, असा प्रवास करून पिंपळगाव उंडा येथे दिंडी मुक्कामास पोहोचेल. गुरुवारी 21 जूनला सकाळी पिंपळगाव वस्ती, जवळके, जाधव वस्ती, शिंदे वस्ती चिंचपूर मशिदीचे व भिलारे वस्ती, पांढरेवाडी, आटोळे वस्ती, शेळगाव असा प्रवास करून तांदळवाडी येथे मुक्काम करेल. शुक्रवारी दिनांक 23 जून रोजी देऊळगाव, डोणजे कसाबाचे, बंगाळवाडी असा प्रवास करून मिरगव्हाण येथे मुक्काम करील. शनिवारी 24 जून रोजी मिरगव्हाण वस्ती, नागोबाचे हिवरे, सालसे, आळसुंदे वस्ती असा प्रवास करून वरकुटे मूर्तीचे येथे दिंडीचा मुक्काम होईल. रविवार दिनांक 25 जून रोजी वरकुटे येथून दिंडीचा प्रवास सुरू होऊन रोपळे, असा प्रवास झाल्यानंतर आठरे येथे दिंडीचे दुसरे रिंगण होईल त्यानंतर भोगेवाडी वस्ती, भोगेवाडी येथे मुक्काम होईल. सोमवार दिनांक 26 जून रोजी ढवळस, पिंपळखुंटे, अंबड, शिराळाचे गोठे, भेंड असा प्रवास करून संत सावता महाराज यांचे श्रीक्षेत्र आरण येथे दिंडीचा मुक्काम होईल. मंगळवार दिनांक 27 जून रोजी बारडी, जाधव वाडी, पवार वस्ती फाटा, मेंढापूर पाटील वाडा असा प्रवास करून पादुका रिंगण होईल व दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल. 

आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा l
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ll
मच्छिंद्रने बोध गोरक्षाशाशी केला l
 गोरक्ष वोळला गहिनीप्रती ll
भगवान श्रीशंकरापासून सुरू झालेली ही परंपरा गहिनीनाथांपर्यंत व गहिनीनाथांपासून पुढे निवृत्तीनाथ व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पर्यंत व माऊलीं पासून ही वारकरी परंपरा या विश्वामध्ये रुजली गेली या सर्व परंपरेचे मूळ उगमस्थान श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड आहे असा उल्लेख श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्रीविठ्ठल महाराज हे नेहमी आपल्या वाणीतून करत असतात. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाला या परिसरामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाऊंच्या दिंडी सोबत आपला प्रवास व्हावा अशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील अनेक भाविकांची इच्छा असते. त्यामुळे दूरवरून भाऊंच्या सोबत या दिंडीत श्रीक्षेत्र पंढरपूर चा प्रवास करण्यासाठी हजारो भक्त श्री विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवास करत असतात. डोंगरदर्‍यातून व पाऊलवाटाने अतिशय दुर्गम भागातून जाणारी ही एकमेव दिंडी आहे श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ महाराज असताना श्रीगहिनीनाथ महाराज यांच्या पादुका घेऊन ही पंढरीची वारी स्वतः भाऊंनी सुरू केली. त्यावेळेला अतिशय मोजका समाज होता. ज्या भागातून दिंड्या जात नाहीत अशा भागातून भाऊंनी जाणीवपूर्वक मार्ग निवडलेला असावा असे जाणकाराचे मत आहे. ज्या भागातील लोक भक्तिमार्गामध्ये जोडलेले नाहीत अशा भागातून लोक वारकरी संप्रदायामध्ये यावेत हाच यामागील भाऊंचा हेतू होता असे म्हणावे लागेल. 

जाहिरात ⤵️

 



Post a Comment

Previous Post Next Post