सारोळा येथे घोड्यावरुन मुलांचा पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश

सुट्टीनंतर शाळेची घंटा पुन्हा वाजली 

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
जामखेड तालुक्यातील सारोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी घोड्यावर बसून पहील्या दिवशी शाळेत प्रवेश केला. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्वतयारी मेळावा व प्रवेशोत्सव उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. 
      
यावेळी इयत्ता पहिली दाखल पात्र विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.यामध्ये बैल गाडीतून व घोड्यावर बसून इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नविन मुलांची मिरवणूक गावामधून काढण्यात आली. मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवू छान, मुलामुलींना, शाळेत पाठवा, सब पढे, आगे बढे, एक-दोन-तीन-चार जिल्हा परिषदेची शाळा छान अशा विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. सर्व पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच मुलांना शिक्षण घ्यावे. मातृभाषा हीच मुलाची शिक्षणाची खरी भाषा आहे. मातृभाषेतूनच मुलांना शिक्षण दिले गेले पाहिजे अशी भावना पालकांनी व्यक्त केली. 

यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक सहभागी झाले होते. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गणवेश व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थांना स्वादिष्ट व रुचकर गोड जेवण देण्यात आले. तसेच जिल्हाअंतर्गत बदलीने सारोळा शाळेत नव्याने हजर झालेले शहाजी जगताप सर, माजिद शेख सर व शबाना शेख मॅडम यांचे शाळेच्या व गावच्या वतीने स्वागत करण्यात आले.
        
या कार्यक्रम प्रसंगी सारोळा गावचे सरपंच अजयदादा काशिद, माजी सरपंच हरिभाऊ खवळे, ग्रामपंचायत सदस्य किरण मुळे, बापूराव तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर सातपुते, SMC माजी उपाध्यक्ष देविदास पवार, शाळेतील शिक्षक सोळंके सर, होळकर सर, श्रीम.रसाळ मॅडम, व सर्व पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post