ल. ना. होशिंग विद्यालयात गायत्री बारगजेचा सत्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
33 व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याबद्दल गायत्री बारगजे हिचा ल. ना. होशिंग विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. यावेळी ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग सर यांच्या हस्ते 
गायत्रीचा सत्कार करण्यात आला. 

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने, रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने रत्नागिरी येथे 24 ते 26 जून दरम्यान 33 व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील 14 खेळाडू पात्र ठरले होते. त्यापैकी गायत्रीने कांस्य पदक जिंकले. गायत्री ल. ना. होशिंग विद्यालययाची माजी विद्यार्थ्यांनी आहे. राज्यस्तरावरील तायक्वांदो स्पर्धेतील तिच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने तीचा प्राचार्य श्रीकांत होशिंग सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापक श्री बाळासाहेब पारखे साहेब, पर्यवेक्षक श्री प्रवीण गायकवाड साहेब,श्री अनिल देडे सर, श्री विशाल पोले सर, समारंभ प्रमुख श्री पोपट जगदाळे सर,शिक्षक प्रतिनिधी श्री किशोर कुलकर्णी. श्री बबनराव राठोड,श्री राऊत मुकुंद,श्री भरत लहाने, तायक्वांदो प्रशिक्षक संतोष बारगजे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 
जामखेड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराच्या प्रांगणात गायत्री लहानपणापासूनच तिचे पिता अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. आजवर जिल्हा विभाग व राज्यस्तरावरील तायक्वांदो स्पर्धेमध्ये तिने यश संपादन केलेले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post