बीड कॉर्नर ते पोलीस स्टेशन रस्त्याचे नाव आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
जामखेड शहरातील बीड रोड काॅर्नर ते पोलीस स्टेशन मार्गाचे नाव आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. जामखेड शहरातील ९० वर्षीय ज्येष्ठ नागरिक शाहूराव बाबुराव राळेभात व  आप्पासाहेब घोलप यांच्या हस्ते या मार्गाचे नामकरण करण्यात आले.


अनेक दिवसांपासून सर्व शिवप्रेमींची मागणी होती कि छत्रपती शिवाजी महाराज चौक (बिड कॉर्नर) ते मोरे वस्ती सदरील रोडला अनेक नावांनी ओळखले जात होते. जसे कि, जुना शिऊर रोड, तहसील रोड, पोलिस स्टेशन रोड, आय. सी. आय. सी बँक रोड त्यामुळे या रोडला विशिष्ट अशी एक ओळख नसल्याने जामखेड मध्ये शासकिय कामासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांची अडचण होत होती. या पार्श्वभूमीवर या रोडला सर्व समावेशक असे एकच नाव किंवा ओळख असावी अशी सर्व शिवप्रेमींची मागणी होती. यानुसार आज दि. २ जुलै रोजी मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक (बीड कॉर्नर) ते पोलीस स्टेशन या मार्गाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग असे नामकरण करण्यात आले. 

 यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. त्यानंतर स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड या संकल्पनेनुसार अतीशय सुंदर आसा नामकरणाचा  फलक लाऊन या मार्गाचे सुशोभीकरण देखील होत आहे. रयतेचे राजे छत्रपती संभाजी महाराजांचे नाव या मार्गाला दिल्याने सदरील मार्गाची विशेष अशी ओळख निर्माण होईल. या वेळी सर्व शिवभक्त, धारकरी, शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
   यावेळी शिवप्रतिष्ठान तालुका प्रमुख पांडुरंग भोसले बोलताना म्हणाले की, या रोडला अनेक नावाने ओळखले जात होते परंतु जामखेडच्या सर्व शिवभक्तांच्या मागणीनुसार या रोडचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग असे करण्यात आलेले आहे. 

        यावेळी जेष्ठ नागरिक आप्पासाहेब घोलप व  शाहूराव बाबुराव राळेभात यांनी या रोडचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज केल्यामुळे आनंद वाटला आणि हा उपक्रम चांगला आहे असे उपक्रम यापुढे घ्यावेत आम्ही सर्व तरुणांच्या मागे आहोत असे मनोगत व्यक्त केले.
उद्घाटन झाल्यानंतर शेवटी शिवरायांचे आठवावे रुप व प्रेरणा मंत्र घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post