धामणगावच्या जि.प. प्राथमिक शाळेत 1100 वह्यांचे वाटप


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव, ता.जामखेड याठिकाणी धामणगावचे सुपुत्र श्री.राहुल हनुमंत घुमरे यांच्या सहकार्याने तसेच HINDUSTAN FEEDS / BARAMATI CATTLE FEEDS PVT. LTD. चे General Manager श्री.अजय पिसाळ यांच्या संकल्पनेतून HINDUSTAN FEEDS / BARAMATI CATTLE FEEDS PVT. LTD. यांच्यामार्फत Corporate Social Responsibility (CSR) योजनेअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना  सुमारे रु.25,000/- किंमतीचे 1100 वह्यांचे वाटप करण्यात आले. 

तसेच यावेळी धामणगावचे भूमिपुत्र व समाजकार्यामध्ये अग्रेसर असणारे संतोष धोंडीबा सुरवसे यांनी शालेय विकासकामांकरिता रु.1,111/- वर्गणी देऊन यांच्यामार्फत धामणगावमधील तसेच कामानिमित्त परगावी गेलेल्या दानशूर व्यक्तींना डिजिटल स्कूलकरीता व शालेय विकासकामांना गती देण्यासाठी वस्तूरुपात किंवा आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.

     सदर कार्यक्रमास HINDUSTAN FEEDS /  BARAMATI CATTLE FEEDS PVT. LTD. चे श्री.युवराज कोळेकर, श्री.परमेश्वर चव्हाण तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दिगंबर नरसिंग महारनवर, श्री.राहुल हनुमंत घुमरे, श्री. महावीर घुमरे, श्री.संभाजी महारनवर, पालक,ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

   शाळेच्यावतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री.रुपेश वाणी सर,पदवीधर शिक्षक श्री.किसन वराट सर,श्री.नारायण लहाने सर,उपाध्यापक श्री.चंद्रकांत पांडुळे सर,श्री.अर्जुन होले सर,श्री.ईश्वर गवळी सर,श्री.नागनाथ बुडगे सर,उपाध्यापिका श्रीमती स्वाती गोरे मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करून शेवटी आभार मानले.

    सदर उपक्रमाबद्दल जामखेड तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री.प्रकाश पोळ साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब, खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.जाधव साहेब, तेलंगशी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.केशवतात्या गायकवाड साहेब यांनी कौतुक केले व प्रशासनाच्यावतीने आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post