महाराष्ट्र न्यूज नेटवर्क:
बुधवार दिनांक २१/७/२०२३ रोजी जामखेड सौ. सुनंदा उद्धव उदारे वय ६८आज कोठारी प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये येऊन स्वतःचा मरणोत्तर संकल्प देहदान अभियान अंतर्गत फॉर्म भरलेला आहे.
यावेळी बोलताना उद्धव रामचंद्र उदारे म्हणाले "मी जामखेड येथे एसटी डेपो मध्ये क्लार्क अधिकारी म्हणून काम केले मी स्वतः जुन २०२२ मध्ये माझाही देहदानचा फॉर्म भरलेला आहे.
माझ्या पत्नीची बऱ्याच दिवसापासून देहदान संकल्प अभियानात फाॅर्म भरायची इच्छा होती. जामखेड येथील बऱ्याच लोकांनी मला येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे देहदान फॉर्म भरले जातात अशी माहिती दिली आणि त्यांचे सामाजिक कार्य खूप उल्लेखनीय आहे. अपघातातील लोकांना वाचवायचे काम त्यांनी बऱ्याच वर्षापासून चालू ठेवले आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी खूप मोठे काम केले आहे."
यावेळी बोलताना सौ सुनंदा उदारे म्हणाल्या
" देहदान केल्यानंतर एका देहा पासून अनेक डॉक्टर बनतील आणि अनेकांचे प्राण वाचवतील माणूस मेल्यानंतर त्याची राख होण्यापेक्षा आपला देह कोणाचे तरी कामाला यावा या उद्देशाने आम्ही आज जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्या ऑफिसला येऊन स्वखुशीने फॉर्म भरत आहे
तसेच मला सुद्धा माझे पती उद्धवराव उदारे यांनी ही माहिती दिली म्हणून मी माझ्या स्वैच्छेने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे स्वखुशीने देहदांनचा फॉर्म भरण्यास आले सगळी माहिती ऐकून मला खूप आनंद वाटला
माझा देह जाळून राख होण्यापेक्षा डॉक्टर होणारे मुले शिकतील आणि माझ्या देहापासून शिकून लोकांचे प्राण वाचतील. "
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले आम्ही जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड अंतर्गत आत्तापर्यंत ४७८ जणांनी देहदानचे फॉर्म भरले असून १२ जणांनी डोळे दान, अवयव दान, देह दान केलेले आहेत या कामात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अहमदनगर यांचे आणि डॉ. सुधीर पवार यांचे सहकार्य लाभले
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, सोनदरा गुरुकुल डोंमरीचे अध्यक्ष अनिल लोखंडे, महेंद्र शिरसागर आदीं उपस्थित होते.