एमआयडीसी प्रश्नाबाबत जामखेडला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको


     महाराष्ट्र न्यूज नेटवर्क: कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी प्रश्नाबाबत दोन्ही तालुक्यातील विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या  वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जामखेड शहरातील खर्डा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध केला. आंदोलनाला अनेक नागरिक युवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

   कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाटेगाव-खंडाळा येथील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आणि केवळ सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या एमआयडीसी बाबतचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. कर्जत जामखेड तालुक्यातील पाच ठिकाणांसह सोलापूर नगर महामार्गावरील मिरजगाव येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी आज (गुरुवार) रास्ता रोको आंदोलन केले. 
   आमदार रोहित पवार  यांनी वेळोवेळी उद्योग मंत्र्यांच्या भेटी घेऊन हा विषय मार्गी लावण्याबाबत विनंती केली. अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला. विधिमंडळ अधिवेशनात वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरही सरकारकडून केवळ मंजुरीचे आश्वासन मिळत असल्याने आणि कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने अखेर आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात भर पावसात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले.

दरम्यान आंदोलनाला बसलेल्या आमदार रोहित पवार यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन तात्काळ स्वरूपात उद्याच्या उद्या बैठक लावून याबाबत चर्चा केली जाईल असे आश्वासन दिले आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती आमदार रोहित पवार यांना केली.

आमदार रोहित पवार यांनीही मंत्री महोदयांच्या विनंतीला मान देऊन तात्काळ आंदोलन स्थगित केले. तीन दिवस उलटून देखील कोणतीही बैठक न घेतल्याने आज (गुरुवार) कर्जत - जामखेड तालुक्यात ठिकठिकाणी एनसीपी कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे.

रास्ता राेका आंदाेलन

कर्जत जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या  वतीने आणि ग्रामस्थांच्या तरुणांच्या सहभागाने जवळपास पाच ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. कर्जत शहर तसेच जामखेड शहरात आणि सोलापूर नगर महामर्गवरील मिरजगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
जामखेड शहरातील खर्डा चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, राजेंद्र कोठारी,मोहन पवार , पिंटू बोरा, संदीप गायकवाड, चंद्रकांत आजबे, सरपंच समीर पठाण, काकासाहेब वाळूंजकर, पवन राळेभात, नरेंद्र जाधव, वैजीनाथ पोले, उमर कुरेशी, शरद शिंदे, सुधीर राळेभात, काकासाहेब कोल्हे, अमर चाऊस, सूर्यकांत मोरे, रमेश आजबे, शहाजी राळेभात, मंगेश आजबे, निखिल घायतडक, प्रकाश काळे, प्रकाश सदाफुलें, कैलास वराट, हनुमंत पाटील, पवन राळेभात, युवराज उगले, सागर कोल्हे, विद्या वाव्हळ,अनुराधा अडाले, वैशाली शिंदे, अनुष्का वारे, प्रिती सदाफुले, संगीता तोरडमल, स्मिता गुलाटी, तरनुम शेख , शुभांगी नन्नवरे, रंजना पवार आदी महिला उपस्थित होते.

आमदार राम शिंदेवर टीका

या वेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. हक्कच्या औद्योगिक वसाहत देण्याबाबत राजकारण होत असून भाजपचे माजी मंत्री आमदार राम शिंदे हेच या प्रकरणात हेतूपूर्वक अडवणूक करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता केला आहे. या रस्ता रोको मुळे सोलापूर नगर महामार्ग ठप्प झाला होता. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post