शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार

 नवीन शिक्षक भरती करून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याची नागपूर विभागाचे पदवीधर आमदार सुधाकर अडबोले यांची मागणी.


राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ही सर्व रिक्त पदे भरण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र शासनाकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही. अलीकडेच अशा रिक्त पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. त्याला अनेक संघटनांनी विरोध केला आहे. तसेच डीएड बीएड कृती समितीच्या वतीने सुद्धा याविषयी तीव्र नापसंती दर्शवली आहे. 

दुसरीकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अनेक दिवसापासून सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र होत नाही याविषयी आमदार सुधाकर अडबाले यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष याकडे वेधले. यावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी शिक्षक भरती प्रक्रियेचा कार्यक्रमही जाहीर केला. विधानपरिषद सदस्य सुधाकर अडबाले यांनी शिक्षक भरतीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. या भरतीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मुलाखतीशिवाय पदभरती उमेदवारांची पडताळणीसाठी 11 ते 21 ऑक्टोबर आणि जिल्हास्तरीय समुपदेशनासाठी 21 ते 24 ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post