पूजा बोकरिया - कोठारी CA परीक्षा उत्तीर्ण, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
जामखेड येथील पारस कोठारी यांची कन्या आणि अहमदनगर येथील CA प्रतिकेश बोकरीया यांची पत्नी सौ पूजा प्रतिकेश बोकरिया चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेमध्ये २१४मार्क मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. 
विशेष म्हणजे जैन समाजातील तीन उपवास काल तिने केले होते आज तिचा पारणा झाला आणि रिझल्ट आला
खूप प्रयत्न केले यश मिळाले यामध्ये पूजाची आजी श्रीमती शांताबाई कोठारी यांचे आशीर्वाद आणि तिचे सासरे प्रशांत बोखरीया, पती प्रतीकेश बोकरीया, सासुबाई सौ. ज्योती बोकरीया,आई सौ. सुनीता पारस कोठारी आणि अनेकांचे मार्गदर्शन लाभले. 
मागील सहा महिन्यापूर्वी पूजाचा विवाह अहमदनगर येथील सी.ए. प्रतिकेश बोकरीया यांच्याशी झाला जामखेड येथील माजी सरपंच सुनील कोठारी, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची ती पुतणी आहे. 
जामखेड येथील जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, एडवोकेट अशोक कोठारी, डॉक्टर रमेश कोठारी, सुमतीलाल कोठारी, राजेंद्र कोठारी,एडवोकेट सुमतीलाल बलदोटा, सी.ए. मिलिंद जांगडा,भारतीय जैन संघटनाचे जिल्हा अध्यक्ष अमोल तातेड सचिव प्रफुल्ल सोळंकी, सौ सुशीला बलदोटा, कन्हैयालाल चोपडा, संतोष कोठारी, सतीश कोठारी, राहुल राखेचा, मनोज दुग्गड,सार्थक कोठारी आदींनी अभिनंदन केले

Post a Comment

Previous Post Next Post