महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याने दोन रौप्यपदक तर दोन कांस्यपदके जिंकली. अशी माहिती अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे सचिव संतोष बारगजे यांनी दिली.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने मुंबई जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने 30 जून ते 1 जुलै दरम्यान 6 व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील बारा खेळाडू पात्र ठरले होते. त्यापैकी संगमनेरच्या कृष्णा चव्हाण व बाभळेश्वर येथील साजिया शेख यांनी रौप्यपदक पटकाविली. तर पाथर्डीच्या संकेत शिरसाठ व बाभबळेश्वर येथील अनुष्का म्हस्के यांनी कांस्यपदके मिळवली. या खेळाडूंना स्पर्धेत खेळताना प्रशिक्षक म्हणून दिनेशसिंह राजपूत व निकिता लकारे (लोणी) तर व्यवस्थापक म्हणून सागर सानप (पाथर्डी) यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील सर्व यशस्वी खेळाडू अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशन अंतर्गत जिल्ह्यातील विविध भागात तायक्वांदो चे प्रशिक्षण घेत आहेत.
त्यांना संगमनेरचे प्रशिक्षक लक्ष्मण शिंदे, लोणी येथील प्रशिक्षक महेश मुरादे, प्रभाकर शेळके, दिनेशसिंह राजपूत, अमोल बोधक, ब्रम्हचैतन्य राजगुरु व साईनाथ वाकडे, पाथर्डी येथील अंबादास साठे, गोरक्षनाथ गालम, सागर सानप, राहुरीचे प्रशिक्षक बाबासाहेब क्षीरसागर, यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव - मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार वेंकटेश कररा, धुलीचंद मेश्राम, नीरज बोरसे, अजित घारगे, सतिश खेमस्कर, विजय कांबळे,
अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, उपाध्यक्ष किरण बांगर, सचिव संतोष बारगजे, सहसचिव अल्ताफ कडकाले, यांनी अभिनंदन केले.
