महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
जामखेड येथिल शिवनेरी अकॅडमीच्या माध्यमातून तालुक्यातील बांधखडक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेत त्यांना खेळांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
काल दि. २४ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा बांनखडक येथील सर्व विद्यार्थ्यांनी जेथे आम्ही सैनिक घडवतो अशा शिवनेरी अकॅडमी जामखेड या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. या ठिकाणी विद्यार्थी आल्यानंतर अकॅडमीचे संचालक सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मणराव भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांच्या १०० व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धा, लांब उडी वर्टीकल रोप, पुलप्स अश्या विविध स्पर्धा सर्व प्रात्यक्षिकासह घेण्यात आल्या.
यामध्ये जे मुलं बेस्ट ऑफ थ्री व मुलींमध्ये बेस्ट ऑफ थ्री आली त्यांना बक्षीस देण्यात आली. त्याचप्रमाणे सेनेमध्ये विद्यार्थी कसा घडतो शिस्त कशी असावी आचार - विचार, व्यायाम व वेळेचे महत्व, याबद्दल अकॅडमीच्या वतीने सुंदर असे मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सर्वांना खाऊ वाटप करून सर्व विद्यार्थ्यांनी दुपारच्या जेवणचा मनसोक्त आनंद घेतला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी अकॅडमीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्याबरोबर आलेले शाळेचे प्राचार्य व त्यांच्याबरोबर आदर्श गुरुवर्य ह.भ.प. श्री.मनोहर इनामदार यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इनामदार सरांनी शिवनेरी अकॅडमीतील बहादूर विद्यार्थ्यांना सुंदर असे मार्गदर्शन व सैनिकाचे महत्त्व,व देशप्रेम याबद्दल मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी मुलांना शुभेच्छा दिल्या.
मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले.
Tags
शैक्षणिक