श्रावणी सोमवार निमित्त श्रीनागेश्वराची तिरंगी सजावट

 
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भारताने चंद्रयान 3 ही मोहीम यशस्वी यशस्वी केल्याबद्दल या निमित्ताने तसेच दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने श्री नागेश्वर सेवा मंडळातील काही तरुणांनी श्री नागेश्वराची विशेष सजावट केली. यावेळी तिरंगी फुलांनी पिंडीवर आकर्षक सजावट करून त्याच्या पाठीमागे चंद्र ग्रहाचे छायाचित्र व त्यावर भगवान शंकर पार्वती चे चित्र लावून ही "शिवशक्ती" असल्याचे देखाव्यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
जामखेड शहरासाठी वरदान ठरलेले, ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात गेल्या काही वर्षांपासून भगवान श्रीनागेश्वराच्या पिंडीला तिथीनुसार व सणानुसार आकर्षक फला-फुलांनी व आकर्षक साहित्यांच्या मदतीने भगवंताला सजावट केली जाते. 

 इस्रो ने चंद्रयान 3 जेथून लँड केले त्या जागेला शिवशक्ती असे नाव संबोधले गेले त्याच अनुषंगाने श्री नागेश्वर भक्त किरण सोनवणे, रोहित पोकळे, प्रशांत काळे, नंदू शिंदे, ओंकार घुले, शुभम काळे, सचिन म्हेत्रे, सागर म्हेत्रे व नागेश्वर सेवा मंडळातील महिला यांनी पांढरा हिरवा आणि केशरी अशा रंगाने गाभाऱ्याची सजावट केली. त्यांनी केसरी रंगासाठी झेंडूची फुले, तर हिरव्या रंगासाठी बेलाची हिरवीगार पाने वापरली. तर पिंडीवर दहीभाताचा लेप लावून पिंडीचा रंग पांढरा शुभ्र केला त्यामुळे संपूर्ण गाभारा आज तिरंगी दिसत होता. गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला एक डिजिटल फ्लेक्स लावण्यात आले. त्यावर चंद्रावर यशस्वी लँड झालेले चंद्रयान 3 मध्यभागी भगवान शंकर-पार्वती प्रतिमा व एका बाजूला तिरंगा ध्वज तर दुसऱ्या बाजूला त्रिशूल आणि त्याचबरोबर शिवशक्ती असे नाव त्यावर टाकण्यात आले. भारत देशाबद्दल व इस्रोच्या कामगिरीबद्दल प्रत्येकाला स्वाभिमान व अभिमान वाटावा अशी सजावट केल्यामुळे सोमवारी केलेली सजावट ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या मंडळांनी संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दररोज सायंकाळी भगवान शंकराची सजावट व सायंकाळी एक यजमान एक एक यजमानाचा हस्ते सायंकाळी पावणे सात वाजता महाआरती चा उपक्रम सुरू केला आहे त्यानुसार ही सजावट करण्यात आली होती त्यानंतर महाआरती झाली यावेळी सौ. शीला चिंतामणी . सौ . निशा कल्याणकर. सौ. कविता गांधी सौ मंदा रसाळ यांनी आरती नंतर भक्तांना प्रसाद म्हणून दूध वाटप केले. 

सोमवार निमित्त येथे वारकरी भजन केले जाते सकाळी दहा ते एक दरम्यान श्री नागेश्वर भजनी मंडळाचे येथे श्रवणीय असे भजन झाले. यावेळी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रह्मे  महादेव पानसांडे हजर होते. 
यावेळी सौ सविता पवार, सौ ज्योती अंधारे, सौ रोमा पवार, सौ अर्चना मुसळे, सौ राणी जाधव, श्री भाऊसाहेब जाधव यांनी काल दुपारची पंगत दिली यावेळी शेकडो भक्तांनी भोजनाचा लाभ घेतला 






Post a Comment

Previous Post Next Post