जामखेड प्रतिनिधी
नान्नज येथील एका व्यक्तीचा मृतदेह जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी स्वतःच्या ॲम्बुलन्स मधून पोलिसांच्या मदतीने आणला. परंतु मृतदेह खाली उतरवण्यास कर्मचारीच नसल्यामुळे श्री. कोठारी व पोलिसांनाच हे काम करावे लागल. जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेहमीच मृतदेह अथवा अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे अशा रुग्णांना किंवा मृतदेहांना स्वतःच खाली उतरून घ्यावे लागत असल्याची खंत संजय कोठारे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे.
बुधवारी नान्नज येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह पोस्टमार्टम साठी आणण्यासाठी जामखेड येथील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन आला. कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन आपले मित्र निखिल कुमकर यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. गाडीमध्ये मृतदेह टाकायला कोणीच मदत केली नाही. तसेच जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मृतदेह उतरून पोस्टमार्टम रूम मध्ये उतरवण्यासाठी बऱ्याच वर्षापासून कर्मचारी नसल्यामुळे खूप हाल होतात स्वतः सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, पोलीस कर्मचारी यांनाच उतरून ठेवावे लागते. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयासाठी कर्मचारी यांची नियुक्ती करावी तसे जिल्हा शल्य चिकित्सक यांना कोठारी यांनी फोनवर माहिती दिलेली आहे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता मी बाहेर आहे मृतदेह उतरून पोस्टमार्टम रूम मध्ये ठेवा असे ते उत्तर दिले जाते. व हे काम आम्हाला स्वतःलाच करावी लागते त्यामुळे येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे आहे.
- संजय कोठारी