राष्ट्रीय किक बाॅक्सिंग स्पध्रेत जामखेडच्या ऋतुराज हुलगुंडे रौप्य, तिघांना कास्यपदक
जामखेड प्रतिनिधी
२३ ते २७ ऑगस्ट दरम्यान हरिवंश ताना भगत इनडोअर स्टेडियम रांची, झारखंड याठिकाणी राष्ट्रीय किक बाॅक्सिंग स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी जामखेड तालुक्यातील ऋतुराज हुलगुंडे, संकेत जमदाडे, योगेश वाघमोडे, साक्षी गायकवाड, शिवानी वीर, नुपूर सातपुते, वैष्णवी सातपुते या खेळाडूंची पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघात निवड झाली होती.
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ऋतुराज हुलगुंडे याने बारा वर्षे वयोगटात ३२ किलो वजन गटांमध्ये रौप्य पदक, संकेत जमदाडे याने सतरा वर्षे वयोगटात ५४ किलो वजन गटांमध्ये कांस्यपदक, योगेश वाघमोडे याने सतरा वर्षे वयोगटात ४८ किलो वजन गटांमध्ये कांस्यपदक, साक्षी गायकवाड हिने चौदा वर्षे वयोगटात ३८ किलो वजन गटांमध्ये कांस्यपदक पटकावून जामखेड तालुक्याच्या क्रिडा क्षेत्राच्या राष्ट्रीय पातळीवरील नावलौकिकात भर घातली.
स्पर्धेमध्ये २७ राज्य आणि ५ केंद्रशासित प्रदेशातील तब्बल ३००० पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. तसेच महाराष्ट्राचे प्रेसिडेन्ट निलेश शेलार सर , स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या संघाचे कोच म्हणून जामखेड येथील ज्ञानेश्वर जमदाडे सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र संघाने तब्बल ८२ सुवर्ण , ७४ रौप्य, तर ९३ कांस्य पदकांसह प्रथम पारितोषिक जिंकण्याचा बहुमान मिळवला.
यशस्वी विध्यार्थ्यांना मास्टर ज्ञानेश्वर जमदाडे यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल शिवसेना अध्यक्ष संजय काका काशीद ,धनलगडे सर ,साळुंके सर,मराठी शाळा मुख्याध्यापक संजय कर्डिले सर ,सागर माकोडे सर ,नितीन मोहोळकर सर यांनी अभिनंदन केले जामखेड तालुका किक बॉक्सिंग असोसिएशन ज्ञानेश्वर जमदाडे सर यांनी अभिनंदन केले.
Tags
क्रीडा