देवाजवळ संसारातलं काही मागूच नये - परमेश्वर महाराज जायभाये

रघुनाथ महाराज चौधरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने श्रीनागेश्वर सप्ताहाची आज सांगता 
किर्तन सुरू असताना डॉ. प्रशांत वारे व डॉ. प्रदीप कात्रजकर यांनी श्री परमेश्वर महाराज यांचे स्वागत केले.

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : दि. २३ ऑगस्ट
" जगद्गुरु तुकोबाराय देवाजवळ काही मागतच नाहीत. आपणही देवाजवळ संसारातलं काही मागू नये "असे प्रतिपादन सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक गुरुवर्य श्री परमेश्वर महाराज जायभाये यांनी केले. जामखेड येथील श्रीनागेश्वर सप्ताहाची ह.भ.प. श्री. रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने आज बुधवारी सांगता होईल. 
 
    श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त श्रीनागेश्वर पालखी सोहळा, शिवलीलामृत पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे श्रीनागेश्वर सेवा मंडळ व सप्ताह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

 या सप्ताहामध्ये मंगळवारी ईश्वर महाराज तौर यांचे प्रवचन झाले. सायंकाळी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक गुरुवर्य श्री. परमेश्वर महाराज जायभाये यांचे कीर्तन झाले.

समितीच्या वतीने संत सेवेचे यजमान विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत वारे यांनी महाराजांचे स्वागत केले. 

     हेचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा  ||
जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगावर चिंतन करत असताना श्री. परमेश्वर महाराज जायभाये म्हणाले ज्ञान प्रधान जीवन म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, शांती प्रधान जीवन म्हणजे संत एकनाथ महाराज  प्रेम प्रधान जीवन म्हणजे संत नामदेवराय , तसेच जगद्गुरु तुकोबाराय यांचं जीवन त्याग प्रधान जीवन होतं. मग ज्यांच्या जीवनामध्ये त्याग असतो ते देवाजवळ किंवा अन्य कोणाजवळ स्वतःसाठी काही मागत नाहीत. वरील अभंगांमध्ये तुकोबारायांनी जरी देवाजवळ मागणी केली असली तरी ती मागणी त्यांनी स्वतःसाठी केली नाही. तुम्हा आम्हा सारख्या भक्तांसाठी ही मागणी देवाजवळ त्यांनी केली. तुकोबारायांची भक्ती श्रेष्ठ होती. ते कधीच देवाजवळ काही मागत नव्हते. परंतु देवानेच त्यांना आग्रह केल्यानंतर ते भगवान पांडुरंगाला म्हणाले, मला काही द्यायचं असेल तर असं काही द्या की मला तुमचा कधीच विसर पडू देऊ नका. देताना मला हेच दान द्या म्हणजेच इतर काही नको. तुम्ही जर मला हे दान दिले तर मी आवडीने तुमचे गुण गाइन. मला कुठल्याही मुक्तीची अपेक्षा नाही, मला कायम असंत संत सहवास घडू द्या, संतांची संगत घडू द्या. हे सांगत असताना परमेश्वर महाराज यांनी वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहू नका असा सर्वांसाठी सल्ला दिला. आणि अभंगाविषयी बोलताना महाराज पुन्हा म्हणाले भक्ती करण्यासाठी तुकोबारायांनी पुन्हा  मनुष्य जन्माची म्हणजेच तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी अशी अपेक्षा केली. 

यावेळी कीर्तनाला मोठी गर्दी झाली होती.
शेवटी संत सेवेचे यजमान विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत वारे यांनी कीर्तनकार गुरुवर्य परमेश्वर महाराज जायभाये यांचा सन्मान केला. 
तसेच महाप्रसादाचे यजमान गणेश म्हेत्रे, अमित पवार, वैभव राऊत व राजेंद्र जाधव उर्फ राजू फिटर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. व नंतर प्रसादाची पंगत झाली त्यावेळी भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.

     कीर्तनाच्या वेळी मृदंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज जायभाये, सुदाम महाराज गायकवाड, ईश्वर महाराज तौर, दादासाहेब महाराज सातपुते, पंढरीनाथ महाराज राजगुरू, मृदंगाचार्य हरिदास महाराज गुंड, विठ्ठल भजनी मंडळ, श्रीनागेश्वर भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ, संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था, जगदाळे वस्ती भजनी मंडळ, बटेवाडी भजनी मंडळ व पंचक्रोशीतील भजनी मंडळींनी साथसंगत केली. 

    श्रीनागेश्वर सप्ताह निमित्त येथे सूरू असलेल्या शिवलीलामृत पारायण सोहळ्याची मंगळवारी सांगता झाली. त्यानंतर दुपारी ग्रंथ पूजन करून गाथा भजनाची सांगता झाली. दुपारी ईश्वर महाराज तौर यांचे प्रवचन झाले. आज बुधवारी दि. २३ ऑगस्टला सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. व शेवटी महाप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगता होईल.

    या संपूर्ण उत्सवासाठी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रम्हे, विनायक राऊत, सिताराम राळेभात, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, संतोष बारगजे, दिलीप कुमार राजगुरू, पांडुरंग भोसले, महादेव पानसाडे, बबन सुर्यवंशी, किरण सोनवणे,नंदू शिंदे, प्रशांत काळे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे, ओम गुरव, श्री नागेश्वर भजनी मंडळाचे जगन्नाथ महाराज धर्माधिकारी(मेजर),शेषेराव मुरूमकर, त्र्यंबक वराट,  मुरलीधर काळे,  गिरधारीलाल ओझा, संतोष राळेभात पाटील अहोरात्र अथक परिश्रम घेत आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post